IPL 2020: रशीद खानची जादुई फिरकी; पूरनची झुंजार खेळी व्यर्थ

रशीद खान, हैदराबाद

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन,

रशीद खान

रशीद खानची जादुई फिरकी आणि त्याला हैदराबादच्या बाकी बॉलर्सनी दिलेली साथ यांच्या बळावर हैदराबादने पंजाबवर 59 रन्सने विजय मिळवला.

हैदराबादने वॉर्नर-बेअरस्टो यांच्या 160 रन्सच्या भागीदारीच्या बळावर 201 रन्स केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना निकोलस पूरनने पंजाबला आशा दाखवल्या. मात्र पूरन आऊट झाला आणि पंजाबने हाराकिरी केली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मयांक अगरवाल झटपट माघारी परतला. त्याने 9 रन्स केल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सिमरन सिंग 11 रन्स करून तंबूत परतला. अभिषेक शर्माने लोकेश राहुलला फसवलं. त्याने 11 रन्स केल्या.

निकोलस पूरन-ग्लेन मॅक्सवेल जोडीने चौथ्या विकेटसाठी 47 रन्सची भागीदारी केली. प्रितम गर्गच्या अफलातून थ्रोच्या बळावर मॅक्सवेल रनआऊट झाला. त्याने 7 रन्स केल्या.

मनदीप सिंग रशीदच्या गुगलीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 6 रन्स केल्या.

निकोलस पूरनने 5 चौकार आणि 7 षटकारांच्या साह्याने 37 बॉलमध्येच 77 रन्सची अविश्वसनीय खेळी करत पंजाबच्या विजयाच्या जिवंत ठेवल्या. मात्र रशीद खानने त्याला आऊट करताच हैदराबादने मॅचवरची पकड घट्टी केली.

हैदराबाचा डाव 132 रन्समध्ये आटोपला. रशीदने 3 तर खलील अहमद आणि टी.नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान त्यापूर्वी हैदराबादने 201 धावांचा डोंगर उभारला.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 160 रन्सची खणखणीत सलामी दिली. वॉर्नरने 40 बॉलमध्ये 5 चौकार आणि एका षटकारासह 52 रन्सची खेळी केली. रवी बिश्नोईने त्याच ओव्हरमध्ये बेअरस्टोला एलबीडब्ल्यू केलं.

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन,

जॉनी बेअरस्टो-डेव्हिड वॉर्नर

बेअरस्टोने 55 बॉलमध्ये 7 चौकार आणि 6 षटकारांसह 97 रन्सची खेळी साकारली. 15 ओव्हर्समध्ये हैदराबादला 160 रन्सची सलामी मिळाली. पुढच्या 5 ओव्हर्समध्ये 41 रन्स करताना त्यांनी 6 विकेट्स गमावल्या.

अब्दुल समद, मनीष पांडे, प्रितम गर्ग यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. केन विल्यमसनने नाबाद 20 तर अभिषेक शर्माने 12 रन्स केल्या.

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन,

जॉनी बेअरस्टो

पंजाबतर्फे रवी बिश्नोईने 3 तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

पंजाबने या मॅचसाठी अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंह आणि मुजीब उर रहमान यांना संधी दिली.

जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)