अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

राजीव कपूर

फोटो स्रोत, STRDEL/AFP via Getty Images

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी बीबीसीशी बोलताना ही माहिती दिली.

ते रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू होते. आपले वडील राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमापासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा प्रचंड गाजला.

ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या प्रेमग्रंथ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

राजीव कपूर यांनी अगदी मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं होतं.

नितू कपूर यांनी राजीव कपूर यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त करत त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)