पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी जखमी, नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचा ममतांचा दावा

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, ANI

नंदीग्राममध्ये आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलाय.

येऊ घातलेल्या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या.

व्हीडिओतल्या दृश्यांमध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक त्यांना उचलून कारच्या मागच्या सीटवर ठेवताना दिसत असल्याचं NDTVने म्हटलंय.

66 वर्षांच्या ममतांना धक्काबुक्की झाली आणि त्यात त्या जखमी झाल्याचं ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय.

उमेदवारी अर्ज भरून येताना आपल्याला काहीजणांनी धक्काबुक्की केली आणि त्यात आपल्या पायाला जखम झाल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

ममता बॅनर्जी यांचा मुक्काम आज नंदीग्राममध्ये असणार होता, पण या घटनेनंतर त्या कोलकात्याला रवाना झाल्या आहेत.

भाजपने मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी ममता हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)