कोरोनाः मुंबईत मॉल्स, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट करणार

कोरोना, अँटीजेन टेस्ट, मुंबई

फोटो स्रोत, XAVIER GALIANA

फोटो कॅप्शन,

मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच मॉल्स, रेल्वे स्टेशनं, बसस्टॉप या ठिकाणी अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना या ठिकाणी या चाचण्या करून घ्याव्या लागतील. चाचणीला नकार दिल्यास एपिडेमिक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.

मॉल्स, बस स्टँड, रेल्वे स्टेशनं या ठिकाणी किती चाचण्या करायच्या याची उद्दिष्टं महापालिकेनं निश्चित केली आहेत.

शॉपिंग मॉल

सीआर2 , सोबो सेंटर, रिलायन्स, फोनिक्स, क्रिस्टल शॉपिंग, अटरिया, स्टार, नक्षत्र, ग्लोबस, सिटी, इन्फिनिटी, प्राइम, ओबेरॉय, ग्रोव्हेल, रघुलीला, मोक्ष, फोनिक्स, मार्केट सिटी, के स्टार, आर सिटी, प्लॅटिनम, एस स्मॉल, नीलयोग, ड्रीम्स या मॉल्समध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात येईल.

प्रत्येक मॉलमध्ये किमान चारशे अँटीजेन टेस्ट करण्यात येतील. मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकाला अँटीजेन चाचणीचं शुल्क भरावं लागेल. चाचणीला नकार दिल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

रेल्वे स्थानकं

ज्या ठिकाणांहून बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेन्स सुटतात किंवा येतात, प्रामुख्याने अशा रेल्वे स्थानकांवर अँटीजेन चाचण्या घेण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर (पश्चिम आणि मध्य), वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकांवर चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रत्य़ेक रेल्वे स्टेशनवर किमान हजार जणांची चाचणी घेण्यात येईल.

बसस्टँड

मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली आणि कुर्ला या बस स्टँडवर अँटीजेन चाचणी करण्यात येईल.

उल्लेख करण्यात आलेल्या गर्दीच्या ठिकाणांव्यतिरिक्त खाऊ गल्ली, फेरीवाले, खरेदीची ठिकाणं, पर्यटनस्थळं, सरकारी कार्यालयं, समुद्रकिनारे या ठिकाणीही चाचणी घेण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)