अमेरिका-भारत: राजनाथ सिंह आणि लॉइड जेम्स ऑस्टिन यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

अमेरिका के रक्षा मंत्री लॉयड जेम्स ऑस्टिन भारत के दौरे पर

फोटो स्रोत, @rajnathsingh

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड जेम्स ऑस्टिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा आहे.

लॉइड जेम्स ऑस्टिन 19 मार्चला दिल्लीत दाखल झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतची बैठक व्यापक आणि फायदेशीर ठरल्याची प्रतिक्रिया दिली. तर ऑस्टिन यांनी सांगितलं, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार म्हणून पुढे आला आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितलं, "आम्ही भारत आणि अमेरिका यांच्यातील जागतिक रणनीतीच्या भागीदारीसाठी प्रतिबद्ध आहोत. दोन्ही देशातील सैन्य संबंध वाढवण्यासाठी, सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी तसंच इतर प्रकरणांमध्येही सैन्यासाठी मदत वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय प्रकरणांचीही चर्चा केली. यूएस इंडो-पॅसिफिक कमांड, सेंट्रल कमांड आणि अफ्रिका कमांडमध्ये भारतीय सैनिकांना मदत वाढवण्याचे ठरलं आहे."

"द्विपक्षीय संरक्षण करार याविषयीसुद्धा चर्चा झाली आहे. यात लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ अॅग्रीमेंट व्यतिरिक्त COMCASA सोबत बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंटवर चर्चा झाली आहे.

अमेरिकेतील संरक्षण उद्योगाने भारतीय एफडीआय नियमांचाही फायदा घ्यावा असे आवाहन आम्ही केले आहे. अमेरिकेसोबत संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याचा आमचा संकल्प आहे. 21 व्या शतकात भारत आणि अमेरिकेचे संबंध निर्णायक ठरतील अशी आम्हाला आशा आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सहयोग आणि भागीदारीसाठी अमेरिका प्रतिबद्ध असल्याचा संदेश दिला असल्याचं लॉइड जेम्स ऑस्टिन यांनी सांगितलं. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी अत्यंत चांगली चर्चा झाल्याचंही ऑस्टिन म्हणाले.

"या भागांत अमेरिकेचे जे व्हिजन आहे त्यासाठी भारत महत्त्वाचा स्तंभ आहे. भारत आणि अमेरिकेची भागीदारी खुली व्हावी आणि मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी ताकदीने उभा आहे."असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)