कोरोना व्हायरस : आदित्य ठाकरे यांना कोव्हिड 19ची लागण

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Facebook

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, "माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या."

कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

फोटो स्रोत, EKNATH SHINDE/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

एकनाथ शिंदे

यात जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, . कापड उद्योग आणि मत्स्य व्यवसायमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, facebook

तसंच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 24 लाख 22 हजार 021 एवढी झाली आहे.

राज्यात शुक्रवारी (19 मार्च) 14,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे 70 मृत्यूंची नोंद झाली.

मुंबईमध्ये शुक्रवारी तब्बल 3,063 नवीन रुग्णांची नोंद झाली.

पुणे महापालिका क्षेत्रात 2,872 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 2,617 रुग्णांची नोंद झाली.

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 37,384 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 90.42 % आहे.

सध्या महाराष्ट्रात 1 लाख 77 हजार 560 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 53 हजार 208 वर पोहोचला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)