कोरोना: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांचा आकडा 5 हजारापार

मुंबई, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी (25 मार्च) कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारापार पोहोचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 5365 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.

आयुक्त इक्बाल सिंह चहल पुढे सांगतात, "बुधवारी 47 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 12 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 6 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 84 टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत."

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार :

  • कोव्हिड-19 रुग्णालय आणि हेल्थ सेंटरमध्ये बेड्सची संख्या 21000 हजारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सद्य स्थितीत मुंबईत 13773 बेड्स असून 5140 रिक्त आहेत
  • येणाऱ्या काळात मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10000 होईल असं गृहित धरून बेड्स उपलब्ध करण्याचं काम सुरू आहे
  • पुढील 6 ते 8 आठवडे रुग्णसंख्या 10000 ने वाढली तरी लक्षणं दिसून न येणारे, डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता 21000 बेड्स लागतील अशी शक्यता आहे
  • गेल्या महिनाभरात मुंबईतील मृत्यूदर 4.6 आहे

इक्बाल सिंह चहल पुढे म्हणाले, "मुंबईकरांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही."

फोटो स्रोत, Sopa images

मुंबईत 10 लाख लोकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात मुंबईत दररोज 1 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

मंगळवारी मुंबईत 40 हजार कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या. ज्यात 5458 लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते.

याबाबत बीबीसीशी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा विचार नाहीये. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्बंध घालण्याचे अधिकारी वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत."

मुंबई महापालिकेने 22 मार्चपासून मॉलमध्ये जाताना कोव्हिड निगेटिव्ह रिपोर्ट किंवा अंटीजिन चाचणी बंधनकारक केली आहे.

काल (24 मार्च) मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "मुंबईत टेस्टींगचं प्रमाण वाढवण्यात आलंय. पालिका 40 हजारापेक्षा जास्त टेस्ट करतेय."

"म्युटेशनमुळे मुंबई केस वाढल्याचे ठेस पुरावे नाहीत. पण रुग्णांची वाढ म्युटेशनमुळे कदाचfत असेलही. हे नाकारता येणार नाही."

"पालिकेचा फोकस टेस्टिंग, बेड्सची उपलब्धता आणि लसीकरण वाढवण्यावर आहे," असं काकाणी यांनी म्हटले.

मुंबईतील कोणत्या भागात कोरोना संसर्ग जास्त पसरतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या वेबसाइटला भेट दिली.

मुंबईतील हॉटस्पॉट कोणते?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

के-वेस्ट- विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, ओशिवारा, जुहू, सांताकृज वेस्ट, डी.एन.नगर, आंबोलीचा परिसर हा या वॉर्डमध्ये येतो. या वॉर्डचा डबलिंग रेट म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवस आहे.

या वॉर्डमध्ये इमारतीतील 964 मजले सील करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्वात जास्त 121 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 1.10 टक्के आहे.

एम-वेस्ट- चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, टिळकनगर, आरसीएफ हा मध्य मुंबईचा भाग. या वॉर्डचा डबलिंग रेट म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस आहे. गेल्या सात दिवसात सरासरी 120 पेक्षा जास्त रुग्ण या भागात आढळून आले आहेत.

या वॉर्डमधील 52 इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने इमारती सील करण्यात आल्यात. तर, 293 इमारतींमधील मजले सील करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकने दिली आहे.

पी-एस - गोरेगाव, बांगूरनगर, आरे कॉलनी, दिंडोशी, मालाड हा उत्तरमुंबईचा भाग. या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 1.07 टक्के आहे. गेल्या सात दिवसातील रुग्णसंख्या सरासरी 160 आहे.

एच-वेस्ट- या वॉर्डमध्ये पश्चिम मुंबईतील विभाग येतात. या भागात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 67 दिवस आहे. या भागात बांद्रा, खार आणि सांताकृजचा भाग येतो. या विभागात कोरोनारुग्ण वाढीचा दर 1.05 टक्के आहे. सरासरी 121 रुग्ण दररोज या भागात आढळून येत आहेत.

के-स्ट- विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व, सहार, एमआयडीसी, जोगेश्वरी पूर्वचा भाग येतो. या भागातील रुग्णसंख्या 0.99 टक्के आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)