सातारा : अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी भूस्खलन

कोयनानगर, सातारा

फोटो स्रोत, Swati patil

फोटो कॅप्शन,

कोयनानगर

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अजूनही अतिवृष्टी सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय. पाटण तालुक्यातल्या मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळेमध्ये भूस्खलन झालंय.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

फोटो स्रोत, District Collector Satara

पाटण तालुक्यातल्या मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळेमध्ये भूस्खलन झालंय. यामध्ये जीवित आणि वित्त हानी झालेली आहे.

NDRF चं पथक आणि स्थानिक प्रशासनाचं इथे बचावकार्य सुरू आहे, पण अजूनही नेमके किती जण बेपत्ता आहेत, याची संख्या अद्याप उपलब्ध नाही.

इथल्या जखमींना हेळवाक इथे बोटीच्या सहाय्याने हलवण्यात आलंय.

फोटो स्रोत, Swati Patil

फोटो कॅप्शन,

कोयनानगर, सातारा

पाऊस अजून सुरूच असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या खबरदारीच्या सूचना

  • जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांतून सध्या नदीत पाणी सोडलं जातंय. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये.
  • नदीपात्राच्या कडेला वा धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी स्थलांतर करावं.
  • गरज नसल्यास मुसळधार पावसात घराबाहेर पडू नये.
  • मोडकळीला आलेल्या वा जुन्या घरात वा इमारतीत आश्रय घेऊ नये.
  • नदी - नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.

फोटो स्रोत, Swati Patil

अतिवृष्टीमुळे महाबळेश्वरमधील लिंगमळा रस्ता पूर्णपणे खचलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)