जसप्रीत बुमराहनं 'तुमची गरज नाही' असं ट्वीट नेमकं कोणासाठी केलं?

जसप्रीत बुमराह

फोटो स्रोत, PAUL ELLIS

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं एक ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. सहसा कमी बोलणाऱ्या जसप्रीतने यावेळीही कमी शब्दात असं काहीतरी लिहिलं की, त्याचा अर्थ नेमका काय असावा याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न क्रिकेटचे जाणकार करत आहेत.

बुमराहने आपल्या ट्वीटमध्ये दोन फोटो अपलोड केले आहेत. पहिला फोटो हा ट्रेंटब्रिज येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टचा आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं - 'स्टील डोंट नीड यू' म्हणजेच 'अजूनही तुमची गरज नाही.'

ट्रेंटब्रिजच्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारत विजयाच्या जवळ असताना पावसाचा अडथळा आला. त्याक्षणी खेळात भारताची स्थिती मजबूत होती. दुसऱ्या फेरीत भारतला जिंकण्यासाठी 209 धावांची गरज होती आणि भारताने एक विकेट गमावून 52 धावा केल्या होत्या.

पाचव्या दिवशीचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि अखेर सामना रद्द करावा लागला. भारताचा विजय पक्का समजला जात होता पण हाती निराशा आली.

फोटो स्रोत, Gareth Copley-ICC

या सामन्यात जसप्रीत बुमराहने 9 विकेट घेतल्या - पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 5 विकेट. जसप्रीतसाठी हा सामना यशस्वी ठरला होता.

एवढं चांगलं खेळूनही भारत सामना जिंकू शकला नाही कदाचित याचं शल्य त्याला बोचत होतं.

परंतु जसप्रीतचे ताजं ट्वीट ट्रेंटब्रिज टेस्ट सामना न जिंकल्यामुळे नाही.

तुम्हाला आठवत असेल न्यूजीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सामन्यात भारताला परभाव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात गोलंदाजीतही भारताचा खेळ निराशाजनक राहिला. न्यूजीलंडच्या टीमने हा सामना 8 विकेटने जिंकला.

प्रचंड टीका

या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळवता आली नव्हती. भारताचा पराभव होताच जसप्रीतवर प्रचंड टीका होऊ लागली.

त्याच्याविषयी बरच काही लिहिलं जात होतं. अनेकजण टोमणा मारत होते. कोणी म्हटलं, की बुमराहला टीममधून काढलं पाहिजे तर कोणी म्हटलं, की बुमराह आता पहिल्यासारखा बुमराह राहिला नाही. अनेकांनी तर त्याला टीमबाहेर काढण्याची मागणी केली.

फोटो स्रोत, Reuters

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही ही मागणी होऊ लागली.

आता पुन्हा एकदा बुमराहच्या ट्वीटचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बुमराहला आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर द्यायचे होते असं दिसून येत आहे.

ट्रेंटब्रिज येथील खेळानंतर त्यांची चर्चा होत आहे. प्रशंसा केली जात आहे, पण आता चांगल्या काळातही आपल्याला अशा लोकांची आवश्यकता नाही असं सांगण्याचा प्रयत्न कदाचित त्याने केला असावा.

बुमराहच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हटलं आहे की, टीमला तुमची गरज आहे. तर कोण म्हटलं तुम्ही डेल स्टेन आणि मॅकग्रॉ यांच्यापेक्षाही चांगले आहात.

बुमराहच्या ट्वीटखालील कमेंट्समध्ये, हे कॅप्शन लिहून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे. तर अनेकजण म्हणाले, तुम्ही त्या सर्वांना चुकीचं सिद्ध केलं.

जसप्रीत बुमराह यांनी भारताकडून आतापर्यंत 21 टेस्ट सामने खेळले आहेत आणि 92 विकेट घेतल्या आहेत, तर 67 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत 108 विकेट घेतल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)