ICC World Cup T-20 Time Table: भारताच्या मॅचेस कधी आहेत ते जाणून घेऊया

विराट कोहली रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ट्वेन्टी-20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताची सलामीची लढत दुबईत 24 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारताची दुसरी लढत 31 ऑक्टोबरला दुबईतच न्यूझीलंडशी होणार आहे, तर 3 नोव्हेंबरला अबू धाबी येथे अफगाणिस्तानशी पुढील सामना होईल.

भारताचे सुपर12 मधील उर्वरित दोन सामन्यांचे प्रतिस्पर्धी मात्र साखळीच्या पहिल्या फेरीनंतर निश्चित होतील. भारत ब गटातील विजेत्याची 5 नोव्हेंबरला, तर अ गटातील विजेत्याशी 8 नोव्हेंबरला सामना करणार आहे.

स्पर्धेची पहिली फेरी 17 ऑक्टोबरला ओमान येथे सुरू होईल. पहिल्याच दिवशी यजमान संघ पापुआ न्यू गिनीशी, तर बांगलादेशचा संघ स्कॉटलंडशी सामना करणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील.

सुपर-12 फेरीला 23 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून, पहिल्याच दिवशी अबू धाबी येथे ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे, तर दुबईत इंग्लंडचा संघ दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजशी मुकाबला करणार आहे. 2016मध्ये इडन गार्डन्स येथे झालेल्या अंतिम सामन्यात विंडीजने इंग्लंडला नमवून जेतेपद पटकावले होते.

मूळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा भारतात होणार होती मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आता ही स्पर्धा युएईत खेळवण्यात येणार आहे.

स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना अबू धाबी येथे 10 नोव्हेंबरला होईल, तर दुसरा सामना दुबई येथे 11 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबई येथेच खेळवला जाणार आहे. 15 नोव्हेंबर या राखीव दिवसाची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन,

2016 मध्ये झालेल्या शेवटच्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपचं जेतेपद वेस्ट इंडिजनं पटकावलं होतं.

पहिल्या फेरीची गटवारी

अ-गट : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया

ब-गट : बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

या दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर12 फेरीसाठी पात्र ठरतील.

सुपर 12 ग्रुप 1

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ए 1, बी 2

भारत, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पाकिस्तान, ए 2, बी 1,

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमी फायनलला जातील.

राऊंड 1 चे वेळापत्रक

सुपर - 12 चे वेळापत्रक

नॉकआऊट

उपांत्य सामना - 1 - 10 नोव्हेंबर

उपांत्य सामना -2 - 11 नोव्हेंबर

अंतिम सामना

14 नोव्हेंबर

  • दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, ओमान क्रिकेट अकादमी, शारजा क्रिकेट स्टेडियम आणि झायेद क्रिकेट स्टेडयम अबू धाबी या चार ठिकाणी सामने खेळवण्यात येतील.
  • दुपारचे सामने 3.30 वाजता तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)