सुनंदा पुष्कर संशयास्पद मृत्यू प्रकरणातून शशी थरूर यांची निर्दोष सुटका

सुनंदा पुष्कर आणि शशि थरूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सुनंदा पुष्कर आणि शशि थरूर

सुनंदा पुष्कर यांच्या मत्यू प्रकरणाशी काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांचा संबंध नाही, असं म्हणत दिल्लीच्या विशेष न्यायालयाने थरूर यांच्यावरील आरोप रद्दबातल केले आहेत.

दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष CBI न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी हा निर्णय दिला आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

सुनंदा पुष्कर यांना जेव्हा नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं '50 कोटींची गर्लफ्रेंड'

सुनंदा पुष्कर प्रकरणात कोणत्याही पुराव्याअभावी शशी थरूर यांचा सहभाग असल्याचे आरोप करता येणार नाहीत, असं म्हणत न्यायालयाने थरूर यांच्यावरील आरोप रद्द केले आहेत.

सुनंदा पुष्कर कोण होत्या?

1. सुनंदा पुष्कर यांचा जन्म 1 जानेवारी 1962 साली झाला होता. त्या काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यांचे वडील पी. एन. दास भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी होते.

2. सुनंदा यांनी श्रीनगरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन मधून पदवी घेतली होती. शशी थरूर यांच्याशी त्यांचं तिसरं लग्न झालं होतं. दुसऱ्या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे.

3. सुनंदा पुष्कर यांचं नाव पहिल्यांदा एप्रिल 2010 मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोची टीमच्या खरेदी प्रकरणातल्या एका विवादामुळे समोर आलं होतं.

IPL चा वाद

4. या टीमच्या खरेदीमध्ये शशी थरूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. प्रकरण इतकं मोठं झालं की, थरूर यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

5. या वादानंतर कोची संघातून सुनंदा पुष्कर यांना त्यांची भागीदारी काढून घ्यावी लागली होती. त्याआधी त्या दुबईच्या एका कंपनीत काम करत होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)