अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीत बोट उलटली, 11 जण बुडाल्याची भीती

ब्रेकिंग

अमरावती जिल्ह्यातील गाळेगाव या ठिकाणी वर्धा नदीमध्ये बोल उलटली. या दुर्घटनेत 11 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दशक्रियेसाठी एकाच कुटुंबातील लोक जात असताना ही घटना घडली. बोटीतील प्रवाशांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.

बचाव पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यानंतर बोट उलटल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी बांधला आहे.

फोटो स्रोत, Sagar Tayade

हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीन मृतदेह हाती आले आहेत. इतर 8 जणांचा शोध सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

बचावकार्य योग्य पद्धतीनं सुरू- आमदार देवेंद्र भुयार

"अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या मधोमध ही वर्धा नदी आहे. या वर्धा नदीमध्ये झुंज नावाचं एक मोठं पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. इथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास आमच्या उरुक तालुक्यातील एकूण 11 लोक या नदीत बुडले. बचावकार्य चांगल्या पद्धतीने सुरु आहे. महसूल प्रशासनाची आणि पोलिस प्रशासनाची टीम इथे आहे. रेस्क्यू ऑपरेशन करणारी टीम दाखल झालेली आहे," अशी माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

"आमचे समाज बांधवसुद्धा मेहनत घेऊन, कौशल्य पणाला लावून, बचावकार्य आणि मृतदेह काढण्याचं काम करत आहेत. दुर्दैवाने 11 पैकी 11 लोक बुडाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापैकी एक 3 वर्षांचा लहान बच्चू तर 32 वर्षांची महिला आणि 48 वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह बाहेर काढलेला आहे. शोधाशोध सुरू आहे, असंही आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितलं.

(ही बातमी अपडेट होत आहे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)