भारतीय नौसेना: महिला अधिकारी निघाल्या आहेत जगभ्रमंतीला

भारतीय नौसेना: महिला अधिकारी निघाल्या आहेत जगभ्रमंतीला

भारतीय नौसेनेतील 6 महिला जगाच्या भ्रमंतीवर निघाल्या आहेत. सहा जणींची ही टीम गोवा - केपटाऊन - गोवा असा सुमारे 21,600 सागरी मैलांचा प्रवास 'INS तारिणी' या शिडाच्या बोटीतून करत आहेत.

अथांग समुद्र आणि खुल्या आभाळाच्या साथीनं नऊ महिन्यांत हा प्रवास पूर्ण होईल. नौदलाचीच एक अत्याधुनिक बोट त्यांच्या वाटचालीचा अविभाज्य घटक असेल.

समुद्रसफरीचा अनुभव असणारे निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे आणि निवृत्त व्हाइस अडमिरल मनोहर औटी या टीमला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या मोहिमेचं सर्वदूर कौतूक होत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)