कायद्याची विद्यार्थिनी कशी झाली पॉर्नस्टार?

पॉर्न, सेक्स, कल्चर
प्रतिमा मथळा चित्रीकरणादरम्यान पॉर्नस्टार

पॉर्नस्टार कसे होतात? ठरवून कुणी या क्षेत्रात येतं की नाईलाज असतो? कायद्याचं शिक्षण घेऊन वकील होणं अपेक्षित असलेल्या एका मुलीने चक्क पॉर्नस्टार होण्याचा मार्ग निवडला.

का निवडला तिने हा मार्ग? याबाबत तिने आपली कहाणी 'बीबीसी'ला कथन केली.

"मी 22 वर्षांची आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून पॉर्न फिल्म्समध्ये काम करत आहे. कायद्याचं शिक्षण घेत असल्यामुळे वकील होईन, असंच मला वाटत होतं. मात्र विद्यापीठात शिकताना पहिल्या वर्षात माझं मत बदललं.

तेव्हा मी कसून अभ्यास करत होते. सात-आठ तास लेक्चर आणि अभ्यासात जात असत. पण पैसा कसा मिळवावा याचा मार्ग सापडत नव्हता.

पैसा मिळवणं मला क्रमप्राप्त नव्हतं खरं तर! शिक्षणासाठी मला कर्ज मिळालं होतं. पण मला कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नव्हतं. आर्थिक बाबतीत स्वावलंबी असावं असं मला नेहमीच वाटायचं.

मॉडेलिंगच्या माध्यमातून पैसे कमावता येऊ शकतात अशी माहिती एका मैत्रिणीने दिली. व्यावसायिक मॉडेलिंगकरता छायाचित्रकाराकडून चांगले फोटो काढून घेण्याचा सल्ला तिने दिला. जेणेकरून माझा पोर्टफोलियो तयार होईल. मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं.

अंतर्वस्त्रात केलं शूटिंग

मॉडेलिंगची सुरुवात सर्वसाधारण झाली. पूर्ण कपडे घालूनच मॉडेलिंग करत असे. मात्र काही दिवसांतच मी नग्न मॉडेलिंगला सुरुवात केली. ही छायाचित्रं अशा मासिकांसाठी असत ज्यांच्याशी पॉर्न कंपन्या संपर्क करत.

ते फोटो पाहिल्यानंतर पॉर्न कंपन्यांकडून विचारणा व्हायची- तुम्ही आमच्यासाठी काम करणार का? इथं काम करावं का यावर मी तीन-चार महिने विचार केला. शेवटी मी पॉर्न कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला कारण हे काम मला सोपं वाटलं.

हा निर्णय घेताना मी नीट विचार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर मला वकील म्हणून काम करणं कठीण असेल याची मला जाणीव होती.

लैंगिक संबंधांबाबत माझ्या मनात मोकळेपणा होता. माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या लोकांच्या पार्टीत जात असे. सेक्स करणं (संभोग करणं) मला आवडत असे. त्यामुळे तेच काम म्हणून करायला मी सुरुवात केली. माझे व्हीडिओ कोणी पाहणार नाही. ते इंटरनेटवर नसतील असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात लाखो नेटिझन्सनी माझे व्हिडिओ पाहिले.

प्रतिमा मथळा पॉर्न शूटिंग

सेक्स म्हणजे 20 मिनिटांचा खेळ

व्हीडिओ चित्रित करण्याची प्रक्रिया मला फार आवडत असे. सेक्स करताना लोक मला पाहतात यात मला काही विचित्र वाटत नसे/ यात मला काही वावगं वाटत नसे. सेक्स पार्टीविषयी माझ्या मनात अवघडलेपण नव्हतं. सेक्स 20 मिनिटांचा खेळ आहे. त्यामुळे हे फारच सोपं होतं. चित्रीकरणादरम्यान जेवढा वेळ मी सेक्स करत असे ते क्षण माझ्यासाठी सुखद असत. प्रत्येक महिन्यात जवळपास सेक्सचे 15 व्हिडिओ मी करू लागले.

कायद्याची डिग्री घेताना एक वर्ष मी हे करत होते. मात्र दोन्ही गोष्टींचं संतुलन राखणं माझ्यासाठी कठीण होत असे. कॉलेजमधल्या शिक्षकांना याची कल्पना आली. शिक्षण आणि पॉर्न दोन्ही एकाचवेळी करता येणार नाही असं त्यांनी सुनावलं.

प्रतिमा मथळा चित्रीकरणादरम्यान पॉर्नस्टार

कायदा, वकील हे सभ्य लोकांचं लक्षण आहे. चारचौघांत सांगता येईल असं पॉर्न हे काम नाही. समाजाने ठरवलेल्या सभ्य नोकरी-व्यवसायांपासून तू दूर गेली आहेस.

माझं ऑनलाइन प्रोफाइल पॉर्न स्टारचं होतं. कायदा का पॉर्न हा निर्णय घेण्याची वेळ आली. मी पॉर्नची निवड केली. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. दर महिन्याला वकील होऊन किती पैसा मिळेल आणि पॉर्नस्टार झाले तर किती पैसा कमवू शकेन असा तुलनात्मक विचार केला. अर्थात हे प्रत्येकाच्या संबंधित क्षेत्रातील कौशल्यावर अवलंबून आहे.

पैसाच पैसा

सेक्सचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मला पन्नास हजारांहून अधिक रूपये मिळत असत. अमेरिकेत यासाठी दीड लाख रूपये मिळतात. कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं असतं तेवढ्या वेळात पॉर्नस्टार म्हणून काम करून स्वत:च्या मालकीचं घर घेऊ शकते.

एखादा वकीलही चांगलं काम करून लाखो रूपये कमावू शकतो. मात्र त्यासाठी परीक्षा देणं आवश्यक आहे आणि ते सोपं काम नाही. त्याशिवाय विद्यापीठाची पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेलच याची कोणतीही हमी नाही. म्हणूनच मी शिक्षण सोडून पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला.

आज मी स्वत:च्या वेबसाइटसाठी काम करते. ट्विटरवर माझे 90 हजार फॉलोअर्स आहेत. तेवढेच इन्स्टाग्रामवरही आहेत. मी लंडनमध्ये स्वत:चं घर खरेदी केलं आहे. जानेवारीत अमेरिकेला जायचा माझा विचार आहे. तिथे काम करण्याचा अनुभव नाही, पण अमेरिकेत या क्षेत्रात प्रोफाइल असावं अशी माझी इच्छा आहे. 'बीबीसी थ्री'च्या कार्यक्रमात 'सेक्स मॅप ऑफ ब्रिटन' कार्यक्रमात मी यासंदर्भात बोलले.

प्रतिमा मथळा पॉर्नस्टार

नकारात्मक बाजू

पॉर्न स्टार होण्याला नकारात्मक बाजूही आहे. लैंगिक आजारांची लागण होऊ नये यासाठी दर पंधरा दिवसांनी आम्हाला चाचण्यांना सामोरे जावं लागतं. असे आजार होऊ नयेत यासाठी आम्ही काँडोमचा वापर करू शकत नाही.

वेबसाइटवर आम्हाला ट्रोल्सच्या वाचाळपणाला सामोरं जावं लागतं. आम्हाला दररोज टीका सहन करावी लागते. वेश्या म्हणून आमची हेटाळणी केली जाते.

मी पॉर्नस्टार म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा मुलांच्या कंपूने मला मारायची धमकी दिली होती. त्यांनी मला चाकू आणि बिन बॅग्सने मारू असं सांगितलं.

मी खूप घाबरले होते. मला पोलिसांकडे तक्रार करावी लागली. आता या सगळ्या प्रकाराला मी सरावले आहे. माझ्याकडे रोखून बघत पाठलाग माणसाविरुद्ध खटला सुरू आहे. तो सलग तीन वर्ष माझा पाठलाग करत होता.

मला निमित्त करून लोक माझ्या कुटुंबाला त्रास देत असत. तेव्हा मला खूपच वाईट वाटत असे. कायद्याच्या क्षेत्रात वकील म्हणून काम करण्याचा मी आता विचारही करू शकत नाही. मी वकील झाले असते तर आयुष्य खूप निराशाजनक झालं असतं.

पॉर्नस्टारच्या निमित्ताने मी जगभरात फिरते. अनेक चांगल्या माणसांना भेटते. पॉर्न इंडस्ट्रीत नसते तर माझं अनुभवविश्व संकुचित राहिलं असतं.

जे आवडतं तेच काम करते

मला जी गोष्ट आवडते तेच काम म्हणून मी स्वीकारलं आहे. सेक्स व्हीडिओ रेकॉर्ड करताना पुरुषाने मला थोबाडीत मारावी असं दिग्दर्शकाचं म्हणणं होतं. मात्र असं करायला मी नकार दिला. सेट सोडून जाण्याची धमकी दिली.

बऱ्याच मुलींना असं वागता येत नाही. पण मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत. त्या मी कधीही ओलांडणार नाही.

थोड्या कालावधीनंतर घरच्यांना माझ्या कामाविषयी कळलं. कोणीतरी माझ्या आजीला निरोप पाठवला.

तुमच्या घरात एक पॉर्नस्टार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? असं विचारण्यात आलं. तो कोण होता मला समजलं नाही. मी नक्की काय काम करते हे मी स्वत:हून घरच्यांना सांगणार होते. घरच्यांना बाहेरून माझ्याविषयी कळल्याने त्या माणसाचा मला राग आला.

आश्चर्य म्हणजे माझ्या घरच्यांनी मला समजून घेतलं. माझी आई सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात आहे. तू स्वत: ही गोष्ट सांगितली असतीस तर बरं वाटलं असतं पण आम्ही तुझी साथ सोडणार नाही. तू या कामात खुश आहेस आणि तुला सुरक्षित वाटतंय ना हे महत्त्वाचं आहे, असं आईने सांगितलं.

प्रतिमा मथळा पॉर्नस्टार

पॉर्न म्हणजे कलंक नाही

माझे सावत्र वडील शेती करतात. पॉर्न इंडस्ट्रीविषयी त्यांचं मत वेगळं आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनी विचार करावा असं मला वाटतं. पण मी कधी त्यांच्याशी या विषयावर बोलले नाही. त्यांच्याशी या विषयावर बोलताना मला अवघडल्यासारखं झालं असतं.

माझे फार मित्रमैत्रिणी नाहीत. मी आहे तशीच आहे. समाजाने ठरवलेल्या नैतिक चौकटीत मी आणि माझं काम फिट बसत नाही. बाहेर जाऊन मद्यपान करायला मला आवडत नाही. माझ्या वयाच्या मुलामुलींचे विचार परिपक्व नाहीत.

पॉर्नस्टार म्हणून मला पाहून फेसबुकवर अनेकजण मला विचारतात. माझ्या कामाविषयी त्यांना उत्सुकता असते. मी किती सुंदर आहे असं अनेकजण सांगतात. तू खरंच पॉर्नस्टार म्हणून काम करतेस का असं अनेकजणी विचारतात. तू वाईट दिसतेस असं कोणीही मला सांगितेलं नाही.

पॉर्न म्हणजे समाजाला कलंक असं मला वाटत नाही. मी फेमिनिस्ट आहे. पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारी महिला म्हणजे अनैतिक या गैरसमजाला माझा विरोध आहे. पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचे फायदे आहेत. पॉर्न इंडस्ट्री सोडावी असं मला वाटत नाही. पॉर्नस्टार असल्याचं ओझं मला कधीच वाटत नाही. खरं सांगायचं तर पॉर्नशिवाय आयुष्याचा मी विचारच करू शकत नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)