BSF कँपवर हल्ला : सीमा सुरक्षा दलाची 9 महत्त्वाची वैशिष्ट्यं

बीएसएफ Image copyright Getty images/TAUSEEF MUSTAFA

भारताच्या सर्व सीमांच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलाची (BSF) 1965 मध्ये स्थापना केली गेली.

घुसखोरी, दहशतवादी हल्ले आणि तस्करी रोखण्यासाठी हे निमलष्करी दल दिवसरात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर निगराणी ठेवतात. त्यामुळे बंडखोरांच्या हल्ल्याचं मुख्य लक्ष्य BSF चे जवानच असतात.

आज श्रीनगर विमानताजवळ असणाऱ्या बीएसएफच्या 182 या बटालियनच्या कँपवर बंडखोरांनी हल्ला केला. यानिमित्ताने हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

सीमा सुरक्षा दलालाच नेहमी का लक्ष्य केलं जातं, हे जाणून घेण्यापूर्वी BSF बाबतच्या या नऊ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात.

  1. बीएसएफची स्थापना 1965 साली करण्यात आली होती. तत्कालीन लष्कराच्या मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीच्या मर्यादा लक्षात घेता हे निमलष्करी दल स्थापण्यात आलं.
  2. बीएसएफचे संस्थापक के. एफ. रुस्तमजी यांनी 1971 च्या बांगलादेश युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बीएसएफच्या स्थापनेतील योगदान लक्षात घेता तटरक्षक दलाच्या स्थापनेसाठी त्यांना पाचारण करण्यात आलं होतं.
  3. 186 बटालियन आणि 2.4 लाख जवान असणाऱ्या या दलाला India's First wall of Defense म्हणजे भारताची पहिली संरक्षक भिंत असं म्हटलं जातं.
  4. जीवन पर्यंत कर्तव्य (Dying unto death) हे बीएसएफचे घोषवाक्य आहे.
  5. दुर्गम भागात जाण्यासाठी बीएसएफकडे उंट आणि श्वानपथकाची वेगळी फौज आहे.
  6. 2001 च्या भूज भूकंपात पीडितांना मदत करण्यासाठी सर्वप्रथम बीएसएफचे जवान पोहोचले होते.
  7. 7. दंगलं आटोक्यात आणण्यासाठी ज्या अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर होतो, तो अश्रुधूर निर्माण करणारं Tear Smoke unit युनिट बीएसएफतर्फे चालवलं जातं.
Image copyright Gettty images/NARINDER NANU

8. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या संस्थेत आता स्त्रियांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.

9. बीएसएफच्या काही अधिकाऱ्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमांवर पाठवलं जातं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)