दिल्लीचं जंतर मंतर नेमकं आहे काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दिल्लीच्या जंतर मंतरवर यापुढे निदर्शनं बंद होणार का?

न्यायमूर्ती आर. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखालील एका खंडपीठाने संसदेजवळच्या जंतर मंतर रस्त्यावरची निदर्शनं, जाहीर सभा, मोर्चे आणि लोकांच्या जमावावर ताबडतोब बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

तात्पुरते उभारलेलं स्टेज, लाऊडस्पीकर लावून सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे या भागात ध्वनी प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे, असं सांगण्यात आलं.

पण तमाम भारतीयांच्या निदर्शनासाठी राजधानीतलं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. इथे दररोज अनेक निदर्शनं होतात. निदर्शनासाठी यापुढे रामलीला मैदानावर जागा द्यावी, असे आदेश लवादाने दिले आहेत.

ऐंशीच्या दशकापर्यंत आंदोलनं संसदेच्या अगदी जवळील राजपथावर आणि बोटक्लब शेजारी व्हायची. पण सुरक्षेच्या कारणामुळं आंदोलनाची जागा जंतर मंतरवर निश्चित केली.

बीबीसी मराठी प्रतिनिधी गणेश पोळ यांचा रिपोर्ट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)