जगातली अशी 10 ठिकाणं जिथे मुलींचं शिक्षण दुरापास्त आहे

जगातलं मुलींच्या शिक्षणासाठीची सर्वात वाईट जागा म्हणून दक्षिण सुदानकडे पाहिलं जातं Image copyright UNICEF
प्रतिमा मथळा जगातलं मुलींच्या शिक्षणासाठीची सर्वात वाईट जागा म्हणून दक्षिण सुदानकडे पाहिलं जातं

समृद्ध देशांमध्ये शाळांमध्ये कशाकशाला प्राधान्य द्यायचं यावरून मतभेद होतात. कुठल्या विषयाला जास्त महत्त्वं द्यायचं, कोणाला अभ्यासात जास्त मदतीची गरज आहे आणि शाळेतल्या कुठल्या सुविधेवर सार्वजनिक निधी खर्च करायचा? यावर वादविवाद होतात.

पण बऱ्याच विकसनशील देशांत पुरेशा शाळाच नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये अगदी प्राथमिक प्रश्न आहे तो, शाळेपर्यंत पोचायचं कसं?

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकभरात जगातील सर्वाधिक गरीब देश शाळांच्या अभाव ही समस्या सोडवण्यात तसूभरही प्रगती करू शकलेले नाहीत.

त्यानंतर आणखी एका अहवालात शिक्षणाची गुणवत्ता तपासली गेली आणि संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार याचा निष्कर्ष धक्कादायक होता. या अहवालात, ६० कोटीपेक्षा अधिक मुलं शाळेत तर जातात पण शिकत काहीच नाहीत, असं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नायजरमध्ये 5 पैकी 4 प्रौढ महिला अशिक्षित आहेत.

समृद्ध पाश्चिमात्य देशांत शिक्षणात मुलांपेक्षा मुली पुढे असतात. पण जगातल्या गरीब देशांमध्ये विशेषतः आफ्रिकेतल्या देशांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या फारच कमी आहे.

आज 'जागतिक कन्या दिना'च्या निमित्ताने आपण जगातल्या अशा ठिकाणांवर नजर टाकू या, जिथे मुलांना शिक्षणासाठी जाणं खूप कठीण आहे. अशा ठिकाणांची यादी काधली आहे.

संघर्षग्रस्त प्रदेश

या १० देशांमध्ये बहुतांश ठिकाणी मुलींसाठी शाळाच नाही.

नाजुक परिस्थिती असलेल्या या देशांमध्ये, अनेक कुटुंब गरिबी, अनारोग्य, अपुरा आहार, युद्ध आणि संघर्षामुळे शाळेचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा दक्षिण सुदानमधले निर्वासित

अशा संघर्षग्रस्त आणि गरीब राष्ट्रांमध्ये मुलींकडून शाळेत जाण्याऐवजी इतर कामांची अपेक्षा केली जाते. अनेक मुलींची लग्न करून दिलं जातं. म्हणजे शिक्षणाचा विषयच संपला.

BBC Innovators: बाळांचा जीव वाचवणारी शँपूची बाटली

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, संघर्षग्रस्त प्रदेशात मुलींचं शिक्षणापासून वंचित राहण्याचं प्रमाण दुपटीनं जास्त असतं.

Image copyright UNICEF
प्रतिमा मथळा चाडमधले निर्वासित : युद्ध आणि संघर्षामुळे लाखो महिला निरक्षर राहिल्या.

खालील आधारावर क्रमवारी दिलेली आहे:

•प्राथमिक शाळांतलं मुलींचं प्रमाण

•माध्यमिक शाळांमधलं मुलींचं प्रमाण

•प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचं प्रमाण

•माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचं प्रमाण

•मुलींची शाळेत जाण्याची वार्षिक सरासरी

•निरक्षर महिलांची संख्या

•शिक्षकांची प्रशिक्षण पातळी

•शिक्षक- विद्यार्थी प्रमाण

•शिक्षणावर होणारा सार्वजनिक खर्च

याशिवाय, सीरियासारख्या काही देशांत खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांचा या यादीत समावेश केलेला नाही.

मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने या १० जागा आहेत सगळ्यात कठीण :

  1. •दक्षिण सुदान : जगातली सर्वांत नवीन देश. या देशानं हिंसा आणि युद्धाचा सामना केला आहे. यामध्ये शाळा उद्ध्वस्त झाल्या आणि अनेक कुटुंबांना बेघर केलं. जवळपास तीन चतुर्थांश मुलींना प्राथमिक शाळेतही जाता आलेलं नाही.
  2. •सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक : प्रत्येक ८० विद्यार्थींसाठी १ शिक्षक
  3. •नायजर : १५ ते २४ वयोगाटातील फक्त १७% मुली सुशिक्षित आहेत.
  4. •अफगाणिस्तान : मुलींच्या तुलनेत मुलांची शाळेत जाण्याची शक्यता जास्त आहे.
  5. •चाड : शिक्षण घेण्यासाठी इथल्या मुलींना अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
  6. •माली : फक्त ३८% मुलींनी आपली प्राथमिक शाळा पूर्ण केली आहे.
  7. •गिनी : 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांचं सरासरी शिक्षण एक वर्षापेक्षा कमी आहे.
  8. •बर्किना फासो : फक्त १% मुलींनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे.
  9. •लाइबेरिया : जवळपास दोन तृतीयांश प्राथमिक विद्यार्थीं शाळेपासून वंचित आहेत.
  10. •इथिओपिया : 5 पैकी २ मुलींचं १८ वर्षाच्या आत लग्न झाली आहेत.

शिक्षकांची कमतरता ही गरीब देशांची मोठी समस्या आहे.

गेल्या वर्षी, संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं की, प्रत्येक मुलीपर्यंत शिक्षणाची गंगा पोचवायची असेल तर २०३०पर्यंत जगभरात ६ कोटी ९० लाख शिक्षकांची भरती करून घेण्याची गरज आहे.

प्रतिमा मथळा फ्लॉरेन्स चेप्ट्यू यांनी आपल्या साठीत वाचू लागल्या, जेव्हा त्यांत्या नातवाने लायब्ररीमधून पुस्तक घरी आणलं.

अहवालानुसार मुलींना शाळेत पाठवता आलं तर देशांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल. याचा वैयक्तिक दृष्ट्याही फायदा होईल - जसा या फ्लॉरेन्स चेप्टू नावाच्या आजीबाईंना झाला. या केनियाच्या एका खेडेगावात राहतात आणि वयाच्या 60व्या वर्षी त्या वाचायला शिकल्या.

वन कॅम्पेनचे अध्यक्ष गेल स्मिथ यांनी, मुलींसाठी शिक्षणातील अपयश हे 'दारिद्र्य कायम ठेवणारं जागतिक संकट' असल्याचं म्हटलं आहे.

१३ कोटी मुली अजूनही शाळेत जाऊ शकत नाहीत. म्हणजेच उद्याच्या १३ कोटी इंजिनियर्स, उद्योजक, शिक्षक आणि नेत्यांपासून जग वंचित राहणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)