तो निर्वासित म्हणूनच जन्माला आला!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रोहिंग्या मुस्लीम : मोहसिनानं बांगलादेशमध्ये अन्वरला जन्म दिला

मोहसिना गरोदर असताना म्यानमारमधून बाहेर पडल्या. बांगलादेशमध्ये पाहोचल्यावर त्यांना मुलगा झाला. नाव ठेवलं अन्वर.

मुलाच्या जन्माचा आनंद होताच, पण तो साजरा करणंही कठीण झालं होतं.

बांगलादेशच्या कँपमध्ये असे अनेक निर्वासित होते. UNICEFच्या आकडेवारीनुसार बांगलादेशमधील छावणीत दोन लाख लहान मुलं राहत आहेत.

पण जेमतेम जन्मलेल्या इवल्याशा अन्वरचा काय दोष?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)