वर्तुळाकार रनवेवर विमान धावणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : वर्तुळाकार रनवे खरंच असं शक्य आहे का?

अनेकदा रनवे क्लीयर नसल्यानं तुमचंही विमान आकाशात घिरट्या घालत वाट बघतं.

कधी रनवे व्यग्र असतो तर कधी कोणतं प्राणी वाट अडवून बसतं.

या समस्येचं समाधान आहे एक वर्तुळाकार रनवे.

नेदरलँड एरोस्पेस सेंटरमधील तज्ज्ञांना वाटतं की, अशा रनवेवर अधिकाधिक विमानं हाताळता येतील, ध्वनिप्रदूषण कमी होईल, इंधनाचा वापर कमी होईल.

त्यामुळे एकूणच विमानतळ परिसराला कमी जागेत जास्त कार्यक्षम पद्धतीने व्यापता येईल.

खरंच असं शक्य आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)