पाकिस्तानची राष्ट्रीय रग्बी खेळाडू
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

क्रिकेटवेड्या देशात तिनं घेतला रग्बीचा ध्यास

भारतासारखाच पाकिस्तानही क्रिकेटवेडा देश आहे. आणि या देशात फैजा मिर्झा ही महिला खेळाडू रग्बीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. या खेळात येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी ती आशेचा किरण घेऊन आली आहे.

"स्पोर्ट्स किटसह राहत्या परिसातील गल्लीतून बाहेर पडणं हे माझ्यासाठी एक दिव्य होतं," असं म्हणणारी फैजा ही राष्ट्रीय महिला संघाची खेळाडू आहे. तिला स्वतःचा क्लब स्थापन करायचा आहे. तिथं हुशार खेळाडूंना निःशुल्क प्रशिक्षण द्यायचं आहे.

रिपोर्टर - उरूज जाफरी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)