परदेशातही जातीभेदाच्या झळा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ब्रिटनमधील दलितांना जातीवर आधारित समाजरचनेचा फटका

जातीवर आधारित समाजरचनेचा फटका ब्रिटनमध्येही दलितांना बसत आहे.

2009 मध्ये ब्रिटीश सरकारच्या जातपात नियामक आयोगानं यावर एक अहवाल दिला होता. हा अहवाल युनायटेड किंगडममधील काही आघाडीच्या संस्थांनी बनवला होता.

पण, हिंदू संस्थांनी हा अहवाल पूर्वग्रहदूषीत असल्याचं म्हणत फेटाळला होता. समानता विधेयकात जातींचा उल्लेख नको, असं काही इतर हिंदू संघटनांचं म्हणणं आहे.

समानतेचा कायदा आल्यास भारतीय वंशांच्या लोकांवर त्याचा परिणाम होईल, असं इथल्या भारतीयांना वाटतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)