'रोहिंग्या हे सुरक्षेला धोका नाहीत'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून ब्रिटीश मंत्र्यांची भारतावर टीका

युकेच्या 'आंतरराष्ट्रीय विकास' खात्याच्या मंत्री प्रीती पटेल यांनी भारताच्या रोहिंग्यांबाबतच्या धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

रोहिंग्यांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहचू शकतो अशी भूमिका भारतानं घेतली आहे त्यावर थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातील पटेल यांनी आपली भूमिका मांडली आहे.

राखिन प्रांतामध्ये वंशसंहार होत असल्यामुळे पाच लाख रोहिंग्यांना स्थलांतर करावं लागलं आहे.

"ते सर्वच जण सुरक्षेला धोका आहेत असं म्हणणं अयोग्य आहे," असं मत प्रीती पटेल यांनी व्यक्त केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)