पाकिस्तानमधल्या अर्ध-विधवांची व्यथा!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अर्धविधवा : भारतात कैद पाकिस्तानी मच्छिमारांच्या बायकांची व्यथा

पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातल्या झांगिसारमध्ये राहणाऱ्या सलमा यांच्या मुलाला भारताच्या हद्दीत मासेमारी करताना अटक झाली. याबद्दल त्यांना प्रसारमाध्यमांतून कळलं.

"मी इंटरनेटवर माझ्या मुलाचा फोटो पाहिला तेव्हा मला त्याच्या अटकेबद्दल कळलं. पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांना अटक केली होती आणि माझ्या मुलाला त्यांनी तुरुंगात टाकलं." ती सांगते.

या धक्क्यामुळे तिच्या पतीचा मृत्यू ओढवला.

भारतीय मच्छिमारांप्रमाणे पाकिस्तानमधले मच्छिमारही भारतातल्या तुरुंगांमध्ये खितपत पडले आहेत आणि त्यांच्या बायकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

त्यांचे नवरे त्यांच्या घरातले एकमेव कमावते पुरुष असल्याने त्यांना प्रचंड कष्ट उपसावे लागतात. दोन्ही देशांमध्ये अशा अनेक स्त्रिया अर्धविधवेसारखं आयुष्य जगत आहेत.

त्यांचे मच्छिमार पती परदेशातल्या तुरुंगात आहेत आणि पतीची प्रतीक्षा करण्यावाचून या स्त्रियांकडे कुठला पर्यायही नाही.

दिल्ली आणि इस्लामाबादमधले संबंध तणावाचे होतात तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फटका समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना बसतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)