'झार'च्या काळातील कलरफुल रशिया

रशियातील कलाकार सर्गेई मिखाइलोविच प्रोकुदिन-गोर्स्की यांनी 1909 ते 1912च्या दरम्यान स्वत: तयार केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ही रंगीत आणि हटके छायाचित्र काढली आहेत. त्यासाठी त्यांना रशियाच्या झार(राजा) कडून विशेष परवानगी मिळाली होती.

फोटो कॅप्शन,

ही रंगीत छायाचित्रं 100 वर्ष जुनी आहेत. प्रोकुदिन-गोर्स्की आवर्त सारणीचे (पीरियॉडीक टेबलचे) जनक आणि रसायन-शास्त्रज्ञ मेंडेलीव्ह यांचे विद्यार्थी होते.

फोटो कॅप्शन,

प्रोकुदिन-गोर्स्की यांना रशियन साम्रज्यात ठिकठिकाणी फिरून फोटो काढण्याची विशेष अनुमती मिळाली होती. त्यावेळी झार निकोलस (द्वितीय) यांच राज्य होतं.

फोटो कॅप्शन,

गेल्या शतकतील रशियन साम्रज्याचं वर्णन या छायाचित्रातून दिसून येतं. ही चित्रं तयार करण्यासाठी प्रोकुदिन-गोर्स्की यांनी रेल्वेचा एक डब्याचा अंधाऱ्या खोली सारखा वापर केला होता.

फोटो कॅप्शन,

प्रत्येक फोटोला ते तीन वेगवेळ्या रंग असलेल्या काचांच्या प्लेटवर ठेवायचे. लाल, निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्लेटवर ठेवल्यावर ते सर्व प्लेट एकत्र करत.

फोटो कॅप्शन,

जगाला माहित नसलेल्या एक वेगळ्या दुनियेची झलक या छायाचित्रातून होते. प्रोकुदिन-गोर्स्की हे व्होल्गा नदीवरच्या शेक्सना नावाच्या जहाजात कर्मचारी होते.

फोटो कॅप्शन,

प्रोकुदिन-गोर्स्की यांनी रशियाच्या उत्तरेपासून ते अफगाणिस्तानपर्यंत प्रवास केला. इथं तपकिरी रंगाचं जॅकेट घालून घोडागाडीतून जाताना.

फोटो कॅप्शन,

ग्रीसमधून आलेली हे लोक जॉर्जियातील चहाच्या मळ्यात काम करत आहेत. पण सध्या ग्रीसमधून इथं कुणीही येत नाही.

फोटो कॅप्शन,

हे समरकंद आहे. रशियन सैन्यानं या भागावर विजय मिळल्यानंतर ते इथं आले होते.

फोटो कॅप्शन,

हा समरकंदचा बाजार आहे

फोटो कॅप्शन,

या फोटोतील हे लोक पहिल्या महायुद्धात लढले. काहीनी रशियन क्रांतीमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता.

फोटो कॅप्शन,

ही दोन माणसं सर्कसची तिकीटं विकत आहेत. त्यांच्या मागे घोडेस्वारी खेळाची जाहिरात आहे.

फोटो कॅप्शन,

1918 साली प्रोकुदिन-गोर्स्की रशियातून स्थलांतरीत झाले. नॉर्वे आणि इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर ते फ्रांसमध्ये स्थायिक झाले. हे सर्व फोटो पॅरिसमधील एक तळघरात सुरक्षित ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसला विकण्यात आलं.