सौदी अरेबियात रोबोला नागरिकत्व मिळाल्याने रोष आणि कौतूकही

सोफिया Image copyright Arab News/You Tube

चला सोफियाला भेटू. ती सोमवारी पहिल्यांदाच रियाधला सगळ्यांसमोर आली.

ती इतकी लोकप्रिय झाली की, 25 ऑक्टोबरला फ्युचर इन्व्हेसमेंट इनिशिएटिव्हच्यावेळी शेकडो डेलिगेट्ससमोर तिला सौदीचं नागरिकत्व प्रदान केलं.

सोफिया ही व्यक्ती नसून ती रोबॉटिक्सची किमया आहे. सोफिया रोबोची लोकप्रियता सौदी अरेबियात मोठी आहे.

सोफियाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर पसरू लागताच स्त्रियांपेक्षा रोबोला जास्त अधिकार कसे काय मिळतात असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्स या कंपनीने सोफिया रोबो तयार केला होता. या रोबोचं प्रात्यक्षिक सादर झालं तेव्हा सोफियानं सर्व प्रेक्षकांना इंग्रजीमध्ये साद घातली. हे भाषण करताना सोफियानं इथल्या स्त्रिया वापरतात तसा पारंपरिक हेडस्कार्फ आणि अबाया घातला नव्हता हे विशेष.

"मला या अनोख्या सन्मानाबद्दल अतिशय आनंद होतो आहे." असं सोफिया या वेळी म्हणाली. "एखाद्या रोबोला देशाचं नागरिकत्व मिळणं हे ऐतिहासिक आहे."

सौदी अरेबियातील नागरिकांनी य #Robot_with_Saudi_nationality हा हॅशटॅग वापरून या घटनेचं स्वागत केलं.

पण काहींनी यावर तिरकस प्रतिक्रिया दिली. त्यांनी #Sophia_calls_for_dropping_guardianship हा हॅशटॅगसुद्धा 10,000 वेळा वापरला.

सौदीत पालकत्वाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक स्त्रीसोबत एक पुरुष हवाच. एकची स्त्री तो शक्यतो त्यांच्या घरचा सदस्य हवा. त्यांना या स्त्रीतर्फे बोलण्याचा अधिकार हवा.

"सोफियाला कोणीही पालक नाही, ती अबायासुद्धा घालत नाही, चेहरासुद्धा झाकत नाही, कसं काय?" असं एका ट्विटर युजरने कमेंट केली.

त्याचप्रमाणे एकाने रोबोच्या चेहऱ्यावर एक हेडस्कार्फ घातला आणि बुरखा घातला आणि लिहिलं, "सोफिया काही वेळानंतर अशी दिसेल."

प्रतिमा मथळा सौदी अरेबियात स्त्रियांना बाहेर जाताना पुरुषांना सोबत घेऊन जावं लागतं.

याबरोबरच सोफिया आणि सौदी स्त्रिया यांची तुलना करणाऱ्या पोस्टसुद्धा काही जणांनी लिहिल्या. तसंच ज्या वेगाने इथे स्त्रियांना नागरिकत्व दिलं जातं त्यावरसुद्धा भरपूर चर्चा झाली.

पत्रकार मुर्तझा हुसैन यांनी पोस्ट लिहिली आहे, "कफला कामगारांनी संपूर्ण आयुष्य इथे काढलं आहे. पण त्यांच्याआधी या रोबोला नागरिकत्व मिळालं आहे."

सौदीच्या कायद्याप्रमाणे मालकाच्या परवानगीशिवाय कोणताही परदेशी कामगार देश सोडू शकत नाही. या व्यवस्थेमुळे कामगारांना त्यांचे हक्क मिळत नाही.

आखाती देश बाहेरून आलेल्या हजारो कामगारांवर अवलंबून असतात. पण मालकांना गुंगारा देऊन पळायला मदत करणारेही इथे असतात. त्यांचा काळा बाजारदेखील इथे अस्तित्वात आहे. पण देशाच्या व्हिसा कायद्यामुळे त्यांना देश सोडणं कठीण होतं.

लेबनीज-इंग्लिश पत्रकार करीम छायेब लिहितात, "इथे हजारो लोक अनाथ असताना मानवी रोबोला नागरिकत्व मिळालं आहे. काय दिवस आले आहेत!"

राज्यकर्त्यांनी केलेल्या सुधारणांची सौदी अरेबिया आतुरतेनं वाटत बघत आहेत.

सौदी अरेबियातील स्त्रियांना स्वातंत्र्य दिवसाच्या उत्सवात सहभागी व्हायची परवानगी दिली. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये स्त्रियांना ड्रायव्हिंगची परवानगीही मिळाली.

प्रिन्स मोहम्मद यांच्या व्हिजन 2030 नुसार सौदी आता तेलावर अवलंबून न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तार करणार आहे.

(अधिकचं वार्तांकन बीबीसी मॉनिटरिंगच्या अमायरा फताहला यांनी केलं आहे)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)