निर्बंधांनंतर कतारचा अन्न स्वयंपूर्णतेसाठी निर्धार

आखाती देशांमधील एका महत्त्वाचा देश असलेल्या कतारवर सौदी अरेबिया आणि अन्य आखाती राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत. अन्न पदार्थांसह बऱ्याच वस्तूंसाठी कतार शेजारी देशांवर अवलंबून होता.

पण या निर्बंधांनंतर आता कतारने अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे. यासाठी कतारनं दुग्धजन्य पदार्थांची कमतरता भासू नये म्हणून 10,000 गाई आयात करण्याचं ठरवलं आहे.

तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वर्षभर उत्पादन घेण्यासही कतारने सुरुवात केली आहे.

कतारहून बीबीसी प्रतिनिधी उमर द्राझ यांचा रिपोर्ट

शूटिंग - फुरकान इलाही

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)