इंडोनेशिया : गे आहे म्हणून बांबूचे फटके आणि जेल

इंडोनेशिया : गे आहे म्हणून बांबूचे फटके आणि जेल

इंडोनेशियाचा 2008 चा पोर्नोग्राफी कायदा वादग्रस्त आहे. त्याखाली अटक झालेल्या व्यक्तींना सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियाच्या आच्चे प्रांतात समलैंगिक पुरुषांना सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले. जकार्तातल्या गे लोकांच्या प्रसिद्ध सॉनावर नुकताच पोलिसांनी छापा मारला. त्यात 58 जणांना अटक केली आणि त्यांची कॅमेरासमोर धिंड काढली.

"इंडोनेशिया म्हणजे ब्रिटन किंवा ऑस्ट्रलिया नाही. आमच्या संस्कृतीचा आदर राखायला पाहिजे" असं इंडोनेशियाचे पोलीस प्रमुख टीटो कार्नव्हिअन सांगतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)