कृत्रिम स्तनांसाठी विणकाम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

केनिया : लोकरीच्या स्तनांमुळे कॅन्सर पीडितांना नवा आत्मविश्वास

केनियाच्या नैरोबीतल्या अॅन न्यामबुराने ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिली आहे. सर्जरीनंतर तिचा स्तन काढल्यामुळे तिला सिलीकॉनचा कृत्रिम स्तन वापरायला दिला.

पण, त्यात येणाऱ्या अडचणींनंतर तिला लोकरीचा स्तन वापरायला मिळाला.

"फक्त स्तन स्त्रियांना परिपुर्ण बनवत नाहीत. एकच स्तन असूनही मी पूर्ण स्त्री म्हणून मोठं आयुष्य जगेन," असं ती पुढे म्हणते.

केनियातल्या स्त्री-पुरुषांचा एक गट स्तन काढलेल्या स्त्रियांना लोकरीचे स्तन मोफत देतो. हे स्तन सगळ्या शेप आणि साईजमध्ये मिळतात.

ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिलेल्या स्त्रिया आणि ज्यांच्या पार्टनर्स ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत पावल्या आहेत असे पुरुष हे स्तन विणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)