अश्लील बघाल तर भूत मानगुटीवर बसेल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दक्षिण कोरिया : अश्लील व्हीडिओ पाहणाऱ्यांना थेट भुताकडून इशारा

दक्षिण कोरियात छुप्या कॅमेऱ्याद्वारे महिलांचं अश्लील चित्रीकरण करण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत हजारो गुन्हे दरवर्षी दाखल होतात.

याला आळा बसावा यासाठी इथल्या पोलिसांनी अजब शक्कल लढविली आहे. त्यांनी हे व्हीडिओ पाहणाऱ्यांना धक्का देण्यासाठी काही खोटे व्हीडिओ तयार केले आहेत.

हे व्हीडिओ पाहून ते पाहणाऱ्याला धक्काच नव्हे तर चांगलीच भीती देखील वाटते. भीतीपोटी अनेक जण हे व्हीडिओ पाहणार नाहीत, असं इथल्या पोलिसांना वाटतं. काय आहे या व्हीडिओत असं?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)