पॅरडाईज पेपर्स : तुम्ही तुमचा पैसा कसा लपवाल?
नावापुरती किंवा एखादी बनावट कंपनी काढा. तिचं मुख्य ऑफिस अशा कुठल्याही देशात उघडा, जिथे कर कमीत कमी असेल किंवा अगदी काहीच नसेल.
आणि मुख्य म्हणजे त्या देशात याबाबत प्रचंड गोपनीयता असेल, उदाहरणार्थ, बर्म्युडा, केमॅन आयलंड्स, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स, किंवा आएल ऑफ मॅन.
आता तुमच्या नॉमिनींना बिझनेस ‘चालवण्यासाठी’ पैसे द्या. तुमचं नाव कागदोपत्री कुठेही येऊ देऊ नका.
नंतर बॅंकेत एक खातं उघडा, शक्यतोवर बाहेरच्या देशात खातं उघडा म्हणजे सगळंच गोपनीय राहील.
ती कंपनी या खात्यात पैसे भरेल. पैसे या ‘कंपनीच्या मालमत्तेवर’ खर्च केले, असं दाखवा. किंवा अशा कर्जांवर ज्यांची परतफेड कधीच होणार नाही.
पैसे लपवायचा हा फक्त एक रस्ता झाला.
अशा रीतीने बाहेरच्या देशात किती पैसा लपवला गेला आहे, काही कल्पना आहे का?
10 लाख कोटी डॉलर्स!
हा आकडा जपान, युके आणि फ्रान्सच्या एकत्रित आर्थिक उत्पन्नाएवढा आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)