नाइस टॉयलेट काय आहे?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारतात अशी 'नाइस टॉयलेट'ची योजना राबवली तर...

घराबाहेर पडल्यावर टॉयलेट नसल्यामुळं किती पंचाईत होते, याचा अनुभव सगळ्यांनाच आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह हमखास अस्वच्छ असतात किंवा बंद तरी असतात.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीचा खर्चही खूप असते. या समस्येला तोंड देण्यासाठी जर्मनीत एक शक्कल लढवण्यात आली आहे.

पब्लिक टॉयलेटची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं 'नाइस टॉयलेट योजना' सुरू केली आहे. यामध्ये स्थानिक बार, कॅफे आणि रेस्टॉरंट येथील टॉयलेट लोकांसाठी खुली केली आहेत. त्याबदल्यात सरकारतर्फे त्यांना ठरावीक फी देण्यात येते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)