मध्य आशियात लेबनॉन हे नव्या संघर्षाचं केंद्र बनत आहे का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मध्य आशियात लेबनॉन हे नव्या संघर्षाचं केंद्र बनत आहे का?

लेबनॉन, इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामुळे मध्य आशियात नव्या संघर्षाची ठिणगी पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

लेबनॉनच्या पंतप्रधानांनी नुकताच राजीनामा दिला आहे. पंतप्रधान साद हरीरी सौदी अरेबियात गेले आणि त्यांनी तिथूनच आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

या घोषणेनंतर लेबनॉनमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. हरीरी यांच्यावर सौदी अरेबियानं राजीनाम्यासाठी दबाव टाकला अशी चर्चा लेबनॉनमध्ये आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)