लावा डोकं : जेव्हा तुम्ही अस्वल बघता

कोडं सोडवल्यामुळं मेंदूला चालना मिळते, असं म्हणतात. मग बीबीसी मराठी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे एक कोडं. तर मग 'लावा डोकं' आणि बघा जमतंय का?

तसं तर या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. जरा 'दूरवरचा विचार' करा आणि पाहा तुम्ही किती पटकन सोडवता ते?

तर चला मग...

तुम्ही एका ठिकाणी फिरायला गेला आहात. फिरताना तुम्ही 5 किमी दक्षिणेकडे जाता, नंतर 5 किमी पश्चिमेकडे आणि 5 किमी उत्तरेकडं चालता.

पण शेवटी तुम्ही ज्या ठिकाणावरून निघाला आहात त्याच ठिकाणी आल्याच लक्षात येत.

त्याच दरम्यान तुम्हाला एक अस्वल दिसतं. आता सांगा, त्या अस्वलाचा रंग काय असेल?

बरोबर उत्तरासाठी इथं क्लिक करा

उत्तर

पांढरा.

जगाच्या पाठीवर असं एकच ठिकाण आहे, ज्याठिकाणी 5 किमी दक्षिणेकडे, नंतर 5 किमी पश्चिमेकडे आणि 5 किमी उत्तरेकडे प्रवास केल्यानंतर पहिल्याच ठिकाणी आपण येतो ते म्हणजे फक्त आणि फक्त उत्तर धृव.

उत्तर धृवावर फक्त पांढरी अस्वलं आढळतात.

सौजन्य- बीबीसी रेडिओ 4 टुडे प्रोग्राम

तुम्हाला हेही आवडेल-

क्विझ : तुम्ही अस्सल पुणेकर आहात का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)