रोबोच्या कोलांटउड्या!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : अबब! हा रोबो तर कोलांटउड्या मारतो!

अमेरिकेतल्या बोस्टन डायनामिक्सनं आतापर्यंतचा सगळ्यांत अद्ययावत रोबो तयार केला आहे. अॅटलास नावाचा हा रोबो चक्क कोलांटउड्या मारतो.

अर्थातच त्याच्या हालचालीत आणखी सफाई यायची आहे. पण तरीही एखादा यंत्रमानव क्लिष्ट मानवी हालचालींच्या इतक्या जवळ आला आहे, हे बघून नवल वाटतं.

कुठल्याही शोध किंवा बचाव मोहिमेसाठी हा रोबो वापरू शकतो, असं हा रोबो बनवणारी कंपनी म्हणते. पण तो प्रत्येक वेळी मानवासारख्या अचूक हालचाली आणि चपळता दाखवू शकेल का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)