रॉबर्ट मुगाबे यांचा अखेर राजीनामा

रॉबर्ट मुगाबे Image copyright Getty Images

झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी राजीनामा दिला आहे. झिंबाब्वेच्या संसदेचे स्पीकर जेकब मुडेंडा ही माहिती दिली आहे.

मुगाबे यांनी स्वेच्छेनं हा निर्णय घेतल्याचं चिठ्ठी लिहून स्पष्ट केलं आहे असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हंटलं आहे.

त्यांच्या या धक्कादायक घोषणेमुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या महाभियोगाच्या सुनावणीला खीळ बसली आहे.

झिंबाब्वेच्या संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मुगाबे यांच्या महाभियोगावर चर्चा सुरू होती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
MPs cheered and celebrated as the resignation was announced

या निर्णयामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण आहे आणि लोकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करायला सुरूवात केली.

गेल्या आठवड्यात लष्करानं सत्ता काबीज केल्यानंतर आणि लोकांच्या आंदोलनानंतरही मुगाबे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता.

उपराष्ट्रपती इमर्सन म्नानगाग्वा यांना दोन आठवड्यापूर्वी पदावरून काढल्यानंतर मुगाबे यांना हटवण्याच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या.

ते स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1980 पासून सतत सत्तेत आहेत. निवडणुकांमध्ये होणाऱ्या हिंसाचारामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली होती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
There were scenes of celebration on the streets of the capital, Harare

मुगाबे यांच्या कार्यकाळात झिंबाब्वेची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. 1980 च्या तुलनेत आता 15 टक्के लोक आणखी गरीब झाले आहेत.

या निर्णयामुळे मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांच्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे लष्करात असंतोष निर्माण झाला आहे. लष्करानं सत्ता काबीज करून मुगाबे यांना नजरकैदेत ठेवलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)