26/11च्या मुंबई हल्ला खटल्यातली सर्वांत लहान साक्षीदार - देविका रोटावन

26/11च्या मुंबई हल्ला खटल्यातली सर्वांत लहान साक्षीदार - देविका रोटावन

26/11च्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जे या हल्ल्यात वाचले त्यांच्या कथा जिवाचा थरकाप उडवतात. देविका रोटावन ही तेव्हा नऊ वर्षांची होती. याहल्ल्यात तिला लागलेल्या गोळीच्या जखमा आजही तिच्या शरीरावर आणि मनावर आहेत.

"जेव्हा गोळी लागली, तेव्हाच माझं लहानपण हरवलं. पण असंही वाटलं, ठीक आहे, मी देशासाठी उभी राहू शकले," असं देविका सांगते.

अजमल कसाबविरोधात तिनं साक्ष दिली. आणि मग तो फासावरही लटकला.

पण अतिरेक्यांविरुद्ध साक्ष दिली, म्हणून अतिरेकी आता तिच्यामागं येतील, या भीतीनं समाजातील अनेकांनी तिच्यापासून दोन हात दूर राहणे पसंत केलं.

तिला त्याचं दुःख वाटतं. पण "देशासाठी मी काहीतरी चांगलं करू शकले, देशासाठी मी उभी राहीले" याचा तिला जास्त अभिमान आहे.

रविवारी त्या हल्ल्याला नऊ वर्षं झाली. आज काय म्हणते देविका?

शूट आणि एडिटींग- शरद बढे, निर्मिती- जान्हवी मुळे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)