आता हातच करणार रिमोटचं काम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

रिमोट हरवलाय? मग हातानेच टीव्ही चालवा ना!

तुम्ही टीव्हीवर एखादा मुव्ही बघत आहात आणि तुम्हाला तहान लागते. तुम्ही मोठे कष्ट करून किचनमधून बाटली आणता आणि बसता. निवांत पाणी प्यायल्यावर लक्षात येतं की टीव्हीचा रिमोट किचनमध्ये राहिला आहे.

ओहो! आता पुन्हा नाही उठायचं!

मग दोनच पर्याय उरतात. एक तर चुपचाप उठून जायचं आणि किचनमधून रिमोट घेऊन यायचा.

किंवा, आपल्या आसपास अशी एखादी वस्तू शोधायची जी रिमोटचं काम करू शकेल!

ही कल्पनाच किती भारी आहे ना. आणि हो, असं खरंच शक्य आहे.

लँकेस्टर विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्यानं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेकांना फायदा होणार आहे. मुख्य म्हणजे रिमोट शोधायची कटकट मिटेल.

आणखी हे वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)