पाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाबरोबर युद्ध झालं तर कसं असेल?

पाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाबरोबर युद्ध झालं तर कसं असेल?

उत्तर कोरिया आपल्या चाचण्या बंद करून जगाला चिथावणं सोडेल, असं काही दिसत नाही. आणि तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपही आक्रमक भाषा वापरताना दिसत आहेत. मग उत्तर कोरियासोबत युद्ध होणार का? आणि झालं तर ते कसं असेल?

अमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकारी डेव्हिड मॅक्सवेल यांनी बीबीसीला सांगितलं की, पहिल्याच आठवड्यात लष्करी आणि सामान्य माणसं मिळून 3 ते 4 लाख लोकांचा जीव जाईल.

तिसऱ्या आठवड्याअखेरीस 20 लाख लोक मरतील.

पेंटागॉनचे निवृत्त विश्लेषक ब्रुस बेख्टॉल सांगतात, “या युद्धात दक्षिण कोरियाची मोठी हानी होईल. तसंच प्रचंड मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला जाईल.”

मॅक्सवेल पुढे सांगतात, “उत्तर कोरियाकडे 2-3 आठवडे पुरतील एवढी शस्त्रं आणि अन्नसाठा आहे. हा साठा संपला की त्यांचा युद्धात टिकाव लागणं अवघड आहे. मग तर ते अणुबॉम्ब वापरतीलच.”

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)