ऑक्सफर्ड ते हार्वर्ड : जगातील दहा सर्वोच्च विद्यापीठांचे मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम

ऑनलाईन Image copyright AlexeyPelikh/Getty Images

जगातील सर्वांत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विद्यापीठांत शिक्षण घेणं, अनेकांच्या आवाक्याबाहेरचं असतं.

इथलं शिक्षण शुल्क जास्त तर असतंच. याशिवाय विद्यार्थ्यांना अशा विद्यापीठांत प्रवेश घेण्यासाठी कठीण प्रवेश प्रक्रियेतून जावं लागतं.

प्रवेश प्रक्रिया कठीण असतेच, याशिवाय अनेक अभ्यासक्रमांसाठी मुलाखतीही द्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अपयशी विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते.

जगातील 10 सर्वोत्तम विद्यापीठं
क्रमांक विद्यापीठाचं नाव देश
1 युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड यूके
2 युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज यूके
3 कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यूएस
4 युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅनफोर्ड यूएस
5 मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यूएस
6 हार्वर्ड युनिव्हर्सिटी यूएस
7 प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी यूएस
8 इंपिरियल कॉलेज, लंडन यूके
9 युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो यूएस
10 युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हेनिया यूएस

पण इंटरनेट आणि या विद्यापीठांच्या प्रयत्नांमुळे या विद्यापीठातील काही अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे.

अशाच काही प्रतिष्ठित विद्यापीठांनी मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या काही अभ्यासक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे.

1. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड

'टाइम्स हायर एज्युकेशन' या ब्रिटिश नियतकालिकाच्या ताज्या अंकात जगातील सर्वोत्तम 1000 विद्यापीठांत 'युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डला' प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.

Image copyright Carl Court/Getty Images
प्रतिमा मथळा युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड

या यादीमध्ये वरचा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यापीठांत अमेरिका आणि युनायटेड किंगडममधील विद्यापीठं आघाडीवर आहेत. या विद्यापीठांचे अभ्यासक्रम जर करायचे असतील तर ते इंग्रजीमध्ये उपलब्ध असतात, याची नोंद घेतली पाहिजे. अर्थात काही अभ्यासक्रमांना सबटायटल्स देण्यात आलेले असतात.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डनं विविध अभ्यासक्रम इंटरनेटच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिले आहेत. पॉडकास्ट, लेखी आणि व्हीडिओ या माध्यमातून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.

या विद्यापीठाच्या ओपन कंटेंट या वेबपेजवर म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय शिक्षणाला उपयुक्त ठरेल असं उच्च दर्जाचं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

यातील काही अभ्यासक्रम असे :

2. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज

'टाइम्स हायर एज्युकेशन' या नियतकालिकाच्या 2017च्या आवृत्तीमध्ये जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे.

Image copyright Graeme Robertson/Getty Images
प्रतिमा मथळा युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज

या विद्यापीठानं इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेले काही मोफत अभ्यासक्रम पुढील प्रमाणे.

3. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Caltech)

अमेरिकेतली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही खासगी संस्था असून विज्ञान आणि तंत्रज्ञान ही क्षेत्रं या संस्थेची वैशिष्ट्यं आहेत. ही संस्था पॅसडिना या शहरात आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नोबेल विजेते किप थ्रोन Caltechमध्ये मार्गदर्शन करताना.

इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध केलेल्या अभ्यासक्रमांचा उद्देश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या पुढच्या पिढीला आपण ज्यापद्धतीनं शिकवतो, त्याचा दर्जा उंचावणे आणि आपण वेगळं काय करू शकतो, हे दाखवणं हा आहे, असं या संस्थेच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.

Coursera आणि edX या शैक्षणिक व्यासपीठांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जगभरातील लोकांसाठी आम्ही विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देत आहोत, असं यात म्हटलं आहे.

या संस्थेचे काही मोफत अभ्यासक्रम असे.

4. युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅनफोर्ड

अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचं स्टॅनफोर्ड विद्यापीठातलं भाषण गाजलं होतं. 'तुमचं ज्यावर प्रेम आहे, त्याचा शोध घ्या,' या आशयाचं हे भाषण आहे. या भाषणामुळं जे विद्यापीठात गुणवत्तेसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे, ते अधिकच प्रसिद्धीला आलं.

Image copyright Justin Sullivan/Getty Images
प्रतिमा मथळा स्टॅनफर्ड विद्यापीठातील ग्रंथालय

या विद्यापीठानं इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेले काही मोफत अभ्यासक्रम पाहुया:

5. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)

अमेरिकेचं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT हे प्रतिष्ठित खासगी विद्यापीठ आहे. या विद्यापीठानं विविध अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यातले काही अभ्यासक्रम असे.

6. हार्वर्ड युनिव्हर्सिटी

अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं नागरिकांसाठी खुले अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Image copyright Darren McCollester/Getty Images
प्रतिमा मथळा हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी

edX वर उपलब्ध असणारे काही अभ्यासक्रम पुढील प्रमाणे :

7. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी

न्यूजर्सी इथल्या प्रिन्स्टनमध्ये असलेली प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतली चौथ्या क्रमांकाची जुनी युनिव्हर्सिटी आहे. टाईम्स हायर एज्युकेशन या नियतकालिकानं या संस्थेला जगात 7वा क्रमांक दिला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी

या विद्यापीठातील काही ऑनलाईन अभ्यासक्रम असे.

8. इंपिरियल कॉलेज, लंडन

इंपिरियल कॉलेजनं बिझनेस आणि अर्थशास्त्र या शाखांना केंद्रस्थानी ठेऊन बरेच अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.

9. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो

टाइम्स हायर एज्युकेशन या नियतकालिकात सर्वोत्तम शिक्षण संस्थामध्ये नवव्या क्रमांकावर आहे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो. या विद्यापीठानं मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले काही अभ्यासक्रम असे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भेट दिली होती.

10. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलव्हेनिया

या विद्यापीठानं मोफत ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले काही अभ्यासक्रम असे.

* बाहेरील वेबसाईटच्या लिंक्सची जबाबदारी BBCची नाही.

(बीबीसी मुंडो या बीबीसीच्या स्पॅनिश भाषा सेवेच्या सौजन्याने)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)