कॅलिफोर्नियात वणवा पेटला : हजारो लोकांचं स्थलांतर

आग

फोटो स्रोत, Santa barbara conty

कॅलिफोर्नियामध्ये वणवा पेटल्यानंतर या भागातील लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. या वणव्याने प्रचंड मोठा भूभाग व्यापला आहे. न्यूयॉर्क सिटीच्या विस्ताराएवढी याची व्याप्ती आहे.

कॅलिफोर्नियातील सांटा बार्बरा आणि कॅर्पिंटेरियामध्ये लागलेला हा वणवा थॉमस वाईल्डफायर या नावानं ओळखला जात आहे. थॉमस वणवा झपाट्याने पसरल्यामुळे नागरिकांना स्थलांतर करावं लागतंय.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलातील जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

फोटो स्रोत, NASA

"सध्या वाऱ्याचा जोर नियंत्रित झाला आहे," असं सांटा बार्बरा काउंटी अग्नी विभागाचे प्रवक्ते माइक एलियासन यांनी म्हटलं.

लॉस एंजेलिसपासून 160 किमी दूर असलेल्या कारपेंटेरिया भागातील लोकांना आपलं घर सोडण्याची सूचना देण्यात आली आहे.

वाऱ्याच्या वेगाची तीव्रता दिवसा वाढण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.

फोटो स्रोत, NASA

संध्याकाळी वाऱ्याचा वेग कमी होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. स्थानिक अग्नीशमन विभागानं आगीची छायाचित्रं ट्वीट केली आहेत. सांटा बार्बरामध्ये राहणारा प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रॉब लोवी यानंही यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

"ही आग आटोक्यात यावी म्हणून मी प्रार्थना करत आहे असं ट्वीट करण्यात आलं आहे. अग्नीशमन दलातील अधिकारी अत्यंत शूर आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये ते लोकांना स्थलांतर करण्यास मदत करत आहेत," असं ट्वीट लोवीनं केली आहे.

कॅलिफोर्निया गेल्या सात दिवसांपासून वणव्यासोबत झुंजत आहे.

कमी आर्द्रता आणि तीव्र हवामानामुळे वणव्यानं लवकर पेट घेतला. त्यामुळे कमी वेळेत हजारो एकरमध्ये ही आग पसरली. अधिकाऱ्यांनी सर्वांत मोठ्या धोक्याचा इशारा दिला आहे.

फोटो स्रोत, Rueters

"पर्यावरण बदलामुळं हा भयंकर स्वरुपाचा वणवा लागला," असं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारचा वणवा दरवर्षी लागू शकतो लागू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

या वणव्यामुळं अंदाजे 2,00,000 लोकांना स्थलांतर करावं लागलं. या आगीमुळं कॅलिफोर्नियातील कोट्यवधी डॉलर्सच्या शेती व्यवसायाचं काय होईल अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, NASA

या वणव्याचे नासाने अवकाशातून सॅटेलाइटच्या मदतीनं फोटो घेतले आहेत.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नी शमन दलाचे सुमारे 5,700 सैनिक झुंजत आहेत.

फोटो स्रोत, NASA

सोमवारी थॉमस वणव्याव्यतिरिक्त पाच मोठे वणवे लागले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)