पाहा व्हीडिओ : मंगळाचं रहस्य उलगडेल हे पृथ्वीवरचं सर्वात तरुण बेट

असं म्हटलं जात की निसर्गासारखा किमयागार नाही. आता हेच बघा. दक्षिण पॅसिफिक समुद्रात खोल तळाशी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात एका बेटाची निर्मिती झाली आहे.

हे पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात तरुण बेट आहे. पण विशेष म्हणजे मंगळावरही अशी बेटं आहेत. या बेटाच्या अभ्यासामुळे मंगळ ग्रहाचं रहस्य उलगडण्यास मदत होईल, असं संशोधकांना वाटतं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)