येमेन बंडखोरांचा सौदीवर क्षेपणास्त्र हल्ला, रियाध लक्ष्य

बुर्कान 2 Image copyright ALMASIRAH
प्रतिमा मथळा बुर्कान 2

सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा येमेनच्या हौदी बंडखोरांनी दावा केला आहे.

रियाधमध्ये एक रॉकेट हल्ला झाला. एका स्फोटाचा आवाज ऐकल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. सोशल मीडियावर आकाशात दिसत असलेल्या धुराचा व्हीडिओ शेअर केला जात आहे.

हौदी आंदोलनाच्या अल मसीरा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, यमामा पॅलेसमध्ये बुर्काना-2 क्षेपणास्त्र सोडण्यात आलं आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?