मेलबर्न क्रॅश : गाडीने अनेकांना चिरडलं, ड्रायव्हरसह दोघांना अटक

ऑस्ट्रेलिया हल्ला Image copyright Reuters

ऑस्ट्रेलियाची राजधानी मेलबर्न शहरात गर्दीच्या ठिकाणी अचानक घुसलेल्या एका गाडीने अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये 14 जण जखमी झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइंडर स्ट्रीटवर झालेल्या या घटनेत 14 जखमी झाले आहेत. त्यातील काही गंभीर आहेत.

Image copyright Reuters

हा चुकून झालेला अपघात नसून मुद्दाम घडवून आणण्यात आला आहे. पण दहशतवादी हल्ला आहे किंवा नाही याविषयी इतक्यात सांगता येणार नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.

या गाडीचा चालक आणि इतर दोघांना या प्रकरणी अटक झाली असून तपास सुरू आहे, असं पोलीस म्हणाले. हल्ल्यामागचा उद्देश अद्याप समजलेला नाही, असं पोलीस कमांडर रसेल बार्नेट म्हणाले.

पांढऱ्या रंगाची SUV गाडी स्थानिक वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता पदपथावर चढली. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना घटनास्थळाच्या भागात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)