ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं कशी ओळखायची?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ: ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाच्या कर्करोगाची 12 लक्षणं कशी ओळखायची? लक्षणं लवकर लक्षात आली तर स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम वर्ल्ड वाइड ब्रेस्ट कॅन्सर, NHS यांनी सुरू केलं आहे.

त्यांनीच ब्रेस्ट कॅन्सरची 12 लक्षणं कशी ओळखायची याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

स्तनाची त्वचा राठ होणं, स्तनावर खळी सदृश्य खाच दिसणं, स्तनाग्राभोवतीची त्वचा तडकणं, स्तनाग्रातून स्त्राव होणं, खाज येणं किंवा वेदना होणं अशी काही लक्षणं जाणवत असतील, तर तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

आक्रसलेली स्तनाग्रं, नसा फुगणं, उंचवटा येणं, व्रण उठणं, त्वचा संत्र्याच्या सालीसारखी होणं, आकारात बदल होणं, गाठ येणं अशी लक्षणं जाणवली तरिही डॉक्टरांकडे जावं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती हवी.

या 12 लक्षणांप्रमाणेच आणखी काहीही वेगळं जाणवलं, तरी तत्काळ डॉक्टरला दाखवा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतातली स्थिती

भारतात दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरच्या एक लाखांच्या वर केसेस नोंदवल्या जातात. त्यापैकी सुमारे 50000 महिला मृत्युमुखी पडत असल्याचा सरकारचा आकडा आहे.

त्यावरून ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याची कल्पना येते. 2012मध्ये तर 144937 केसेस नोंदल्या गेल्या. तर, 70218 महिलांचा मृत्यू झाला.

त्याच वर्षी अमेरिकेत ब्रेस्ट कॅन्सरच्या 232714 नोंदल्या गेल्या. तसंच 43909 महिलांचा मृत्यू झाला. चीनमध्ये 1,87,213 केसेसची नोंद झाली. तर 47,984 महिलांचा मृत्यू झाला.

ही आकडेवारी ब्रेस्ट कॅन्सर इंडियानं ग्लोबोकॉन प्रकल्पात झालेल्या तुलनात्मक अभ्यासातून पुढे आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)