पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांवर लादली होती ही 5 बंधनं

कुलभूषण जाधव Image copyright Twitter/Pakistan Foreign Ministry
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी.

सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. पाकिस्ताननं या भेटीपूर्वी आणि भेटीदरम्यान कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईवर अनेक निर्बंध लादले होते.

पाकिस्तानचं हे वर्तन नियमबाह्य आणि अयोग्य होतं, असं भारतीय परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या भेटीच्या वेळी केलेल्या कृत्यांची यादी परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव यांच्या विरोधात पाकिस्ताननं खूप पुरावे जमा केल्याचा दावा केला आहे.

1. ज्यावेळी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये आले त्यावेळी त्यांच्या जवळपास माध्यमं येणार नाहीत असं ठरलं होतं. पण पाकिस्तानी माध्यमं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल अनुचित प्रश्न आई आणि पत्नीला विचारले.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी

2. सुरक्षेचं कारण पुढे करून जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढून ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.

Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE
प्रतिमा मथळा भेटीदरम्यानचं दृश्य.

3. जाधव यांच्या आईला मराठीतून बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. तसंच त्या बोलत असताना सातत्यानं व्यत्यय आणला जात होता.

Image copyright FAROOQ NAEEM/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा जाधव यांची पत्नी आणि आई.

4. जाधव यांच्या पत्नीला भेटीपूर्वी शूज काढून ठेवण्यास सांगितलं. भेटीनंतर त्यांनी आपले शूज परत मागितले, ते देण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नकार दिला. परत परत मागूनही त्यांनी ते दिले नाहीत. हा उद्दामपणा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव

5. संपूर्ण भेटीदरम्यान कुलभूषण जाधव हे तणावाखाली दिसत होते. त्यांना ठरलेलीचं उत्तरे देण्यात येण्यावर दबाव टाकण्यात आला होता, असं दिसत असल्याची आम्हाला जाणीव झाली असं परराष्ट्र खात्यानं त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)