प्राणीविश्वाची गंमतजंमत!

'द कॉमेडी वाईल्डलाइफ' ही छायाचित्रकारांच्या कलेला आव्हान देणारी स्पर्धा यंदाही पार पाडली. यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्षं आहे.

या स्पर्धेत फांदीवरून पडणाऱ्या आणि तरीही स्वत:ला सावरणाऱ्या या घुबडाच्या फोटोनं बाजी मारली.

तब्बल 3500 स्पर्धकांमधून निवडलेली ही काही छायाचित्रं!

Image copyright Tibor Kercz / Barcroft Images
प्रतिमा मथळा एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या या घुबडाच्या त्रिकुटापैकी एक घुबड खाली पडलं. तोल सावरून पुन्हा फांदीवर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घुबडाची मुद्रा टिपली आहे तिबोर कर्स्झ यांनी. हंगेरीतील ओप्युस्झटेझर इथल्या या अद्भुत फोटोने पहिला क्रमांक पटकावला नसता तरच नवल.
Image copyright Andrea Zampatti / Barcroft Images
प्रतिमा मथळा आंद्रेआ झंपाटी यांनी इटलीतल्या इटुकल्या रानउंदीराचा फोटो 'ऑन द लँड' विभागात विजेता ठरला.
Image copyright Penny Palmer
प्रतिमा मथळा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातलं हे बीव्हर निवांत पहुडलेल्या क्षणी आळस देतानाचा हा फोटो टिपला आहे पेनी पाल्मर यांनी.
Image copyright Carl Henry
प्रतिमा मथळा दक्षिण जॉर्जियातील दक्षिण अटलांटिक बेटावरील चर्चवारीसाठी सज्ज झालेल्या या पेंग्विन मंडळींचा फोटो टिपला आहे कार्ल हेन्री यांनी.
Image copyright Olivier Colle
प्रतिमा मथळा भरपूर गवत घेऊन निघालेला हा बेल्जियममधला ससा टिपला आहे ऑलिव्हर कोल.
Image copyright Katy Laveck-Foster
प्रतिमा मथळा बाइक सफारीला निघालेले ही मर्कटांची दुक्कल आपल्याला अचंबित करते. केटी लाव्हेक-फोस्टर यांनी ही भावमुद्रा टिपली आहे.
Image copyright Jean-Jacques Alcalay
प्रतिमा मथळा केनियातल्या मसाई मारा इथे आपल्या कळपाचं निरीक्षण करणाऱ्या रानगव्याचं चित्र टिपलं आहे जीन जॅक अल्कले यांनी.
Image copyright George Cathcart
प्रतिमा मथळा विचारमग्न अशा सील प्राण्याची ही चिंतनशील मुद्रा टिपली आहे जॉर्ज कॅथकार्ट यांनी. कॅलिफोर्नियातल्या सॅम सिमोइन इथलं हे दृश्य आहे.
Image copyright Daisy Gilardini
प्रतिमा मथळा आपल्या आईशी खेळणाऱ्या या लहानग्या ध्रुवीय अस्वलाचा फोटो. कॅनडातल्या मॅनितोबा इथलं हे मोहक दृश्य टिपलं आहे डेसी गिलार्डिनी यांनी.
Image copyright Daniel Trim
प्रतिमा मथळा थायलंडमधली बेडकासारखी दिसणाऱ्या मडसीपर्सची ही जोडगोळी टिपली आहे डॅनियल ट्रीम यांनी.
Image copyright Douglas Croft
प्रतिमा मथळा अमेरिकेतल्या सॅन जोस इथल्या कोल्ह्याने नैसर्गिक विधीसाठी हिरव्यागार गोल्फ कोर्सची निवड केली.
Image copyright Troy Mayne / Bancroft images
प्रतिमा मथळा समुद्री कासवाकडून थप्पड खाल्लेल्या माशाची ही अवस्था कॅमेऱ्यात कैद केली आहे ट्रॉय मेय यांनी. अंडर द सी विभागात या फोटोने प्रथम क्रमांक पटकावला.
Image copyright John Threlfall
प्रतिमा मथळा विमानापाठोपाठ आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याचे हे छायाचित्र अप इन द एअर विभागात सर्वोत्कृष्ट ठरले. जॉन थ्रेलफॉल यांनी हे सुरेख दृश्य टिपलं आहे.

हे वाचलं का-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)