नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील भन्नाट फोटो

2018 या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील काही खास फोटो तुम्ही इथं पाहू शकता.

Image copyright GEOFF ROBINS/ AFP
प्रतिमा मथळा हे चित्र नायगरा धबधब्याचं आहे. गोठवणाऱ्या थंडीमुळे धबधबा तर गोठला आहेच, पण निरीक्षण पॉइंटची अशी स्थिती झाली आहे. यापूर्वी 2014च्या जानेवारीत धबधबा गोठला होता. त्यावेळी तापमान -19 से. होतं.
Image copyright KYODO / REUTERS
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाच्या प्योगयांग इथं इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बर्फाच्या शिल्पासमोर छायाचित्र काढण्याकरता लोक एकत्र आले होते. त्यावेळी तादाँग नदीवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
Image copyright SIVARAM V / REUTERS
प्रतिमा मथळा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केरळमधल्या कोचिन कार्निव्हलमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत असलेला कलाकार.
Image copyright NIGEL RODDIS/ EPA
प्रतिमा मथळा 31 डिसेंबरच्या रात्री इंग्लंडमधील अलान्डेल गावामधले गावकरी जळत्या डांबराची पेटी डोक्यावर घेऊन जात आहेत. ही अशी एकूण 45 माणसं आहेत, ज्यांना गायझर्स म्हटलं जातं. शेवटी ही सर्व मंडळी गावातल्या मध्यभागी जमतात आणि पेट्यांना फेकून देतात. जी व्यक्ती सर्वांत शेवटी पेटी फेकते, तिची निंदा केली जाते.
Image copyright VICTORIA JONES/ PA
प्रतिमा मथळा लंडनमधील 'लंडन आय'वर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
Image copyright PATRICIA DE MELO MOREIRA / AFP
प्रतिमा मथळा ब्राझिलियन सर्फर लुकास चुम्बो 2018 सालच्या पहिल्या सत्रादरम्यान रायडिंग करताना. हे सत्र पोर्तुगालच्या नझारे इथं आयोजित करण्यात आलं होतं.
Image copyright MERSEYSIDE FIRE AND RESCUE SERVICE
प्रतिमा मथळा लिव्हरपूलमध्ये पार्क केलेल्या गाड्या आगीच्या भस्मासुरात जळून खाक झाल्या. एकूण 1300 वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ईको अरेनाकडून 'लिव्हरपूल इंटरनॅशनल हॉर्स शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच ही आग लागल्यामुळे शेकडो लोक आगीत अडकून पडले होते.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यू यॉर्क सिटीच्या कोनी आयलँड पोलार बीअर क्लबवर न्यू इयर डे प्लंजमध्ये पोहणाऱ्यांनी अति थंड पाण्यात धावण्याची स्पर्धा केली.
Image copyright AMIT DAVE/ REUTERS
प्रतिमा मथळा अहमदाबाद येथे आठवडाभरासाठी आयोजित केलेल्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी योग करताना शाळकरी मुले.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)