गोल्डन ग्लोब सोहळा : अझीझ अन्सारीची ऐतिहासिक कामगिरी

अझीज अन्सारी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अझीज अन्सारी

७५व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस् मध्ये 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही शो साठी अझीझ अन्सारी याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला आहे.

नेटफ्लिक्सवरील 'मास्टर ऑफ नन' या टीव्ही सीरीजमधला तो प्रमुख कलाकार आहे. या मालिकेचा तो निर्माताही आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गोल्डन ग्लोबमध्ये अन्सारीच्या नावावर विक्रम.

यंदाच्या गोल्डन ग्लोब सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे त्यातली राजकीय आणि सामाजिक आशयाची भाषणं.

एकापाठोपाठ एक लैंगिक छळवणुकीच्या अनेक आरोपांनी गेल्या वर्षात हॉलीवूडला हादरवून सोडलं होतं. पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आणि पाहुण्यांनी याबद्दल परखड मतं मांडली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा व्हेरॉनिका फेरेस (डावीकडे), एमा स्टोन आणि बिली जीन किंग (मध्यभागी), शॅरन स्टोन (उजवीकडे).

कार्यक्रमाचा सूत्रधार आणि टॉक शो होस्ट सेथ मायर्स याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच लैंगिक छळवणुकीच्या विषयाला हात घातला.

उपस्थितांपैकी अनेकांनी काळे पोशाख घालून लैंगिक छळवणुकीविरुद्ध प्रतीकात्मक विरोध प्रकट केला.

Image copyright Kevin Winter
प्रतिमा मथळा गेम ऑफ थ्रोन्सचे अभिनेते एमिलिया क्लार्क (डावीकडे) आणि किट हॅरिंग्टन.

प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि स्त्रियांचा मोकळेपणाने बोलण्याचा हक्क याबद्दल टीव्ही शो होस्ट ओप्रा विन्फ्रेने केलेल्या भावपूर्ण भाषणाला उपस्थितांनी मनापासून दाद दिली. ओप्राला यंदाचा मनोरंजन क्षेत्राला अद्वितीय योगदान (outstanding contributions to the world of entertainment) हा पुरस्कार मिळाला.

हा पुरस्कार मिळवणारी ओप्रा पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला ठरली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ओप्रा विन्फ्रेच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

'बिग लिटल लाईज' या टीव्ही सीरीजची निर्माती आणि हॉलिवूडची अभिनेत्री रीस विदरस्पून हिनेही लैंगिक छळवणुकीबद्दल मत मांडलं.

"ज्या लोकांनी लैंगिक छळवणुकीविरुद्ध आवाज उठवला त्या सगळ्यांची मी आभारी आहे. तुम्ही खूप शूर आहात. आम्ही तुमचं म्हणणं ऐकतोय, आम्ही तुमच्याकडे पाहतोय. आम्ही तुमचं म्हणणं जगापर्यंत पोचवू."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रीस विदरस्पून.

बिग लिटल लाईज या टीव्ही सीरीजला बेस्ट टेलिव्हिजन लिमिटेड सीरीज चा पुरस्कार मिळाला. त्यातल्या कामासाठी अभिनेत्री निकोल किडमनलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

टाईम्स अप आणि 50:50 ह्या दोन कँपेन्सच्या समर्थनार्थ अनेकांनी त्यांचे बिल्ले आणि लेपन पिन वापरल्या आणि आपली भूमिका मांडली.

Image copyright Reuters/PA/Getty
प्रतिमा मथळा अनेकांनी काळा रंग घालून छळवणुकीचा प्रतिकात्मक विरोध केला.

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)