अमेरिका : कॅलिफोर्नियाच्या पुरात चिखलगाळाचा कहर; 13 मृत्युमुखी

अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्नियात आलेल्या पुराबरोबर मोठ्या प्रमाणात चिखलगाळ वाहून आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जण मृत्युमुखी पडले आहेत. मदतकार्य सुरू असून, 12हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

सँटा बार्बरा प्रांतात 28 जण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यात या परिसरात वणवे भडकले होते आणि आता पुराचा फटका बसला आहे. 100हून अधिक घरं मोडकळीस आली असून, 300हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.

प्रतिमा मथळा कॅलिफोर्नियात पूरासह आलेला चिखलगाळ

अमेरिकेतल्या दक्षिण कॅलिफोर्निया प्रांतात वर्षअखेरीस वणवे पेटले होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली होती. पहिल्याच पावसाच्या तडाख्यामुळे इथे मोठा पूर आला असून, त्याबरोबर मोठ्या प्रमाणावर चिखलगाळ वाहून आला आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चिखलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

काही ठिकाणी कंबरेपर्यंत चिखल साठला आहे. पहिल्या महायुद्धातील युद्धभूमीप्रमाणे स्थिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा चिखलाने झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आपात्कालीन यंत्रणा राबत आहेत.

पूराबरोबर चिखलगाळ वाहून आल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर डझनभर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. 163 नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा नैसर्गिक संकटामुळे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.

पुराचं पाणी आणि चिखल साठल्याने मुख्य किनारी रस्त्याचा 48 किलोमीटर्सचा टप्पा बंद झाला आहे. अनेक ठिकाणांचा संपर्क तुटला आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा या संकटामुळे दक्षिण कॅलिफोर्नियातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

कॅलिफोर्नियाजवळच्या सँटा बार्बराच्या पूर्वेकडील भागात 300जण अडकल्याची माहिती समोर येते आहे. मदत यंत्रणांना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असून, त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा पूर आणि चिखलामुळे मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

या नैसर्गिक संकटामुळे अनेकजण बेघर झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यामुळेही अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं. अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा या आपत्तीमुळे कॅलिफोर्नियाला आर्थिक फटका बसला आहे.

चिखलगाळ आणि हवामानाशी निगडीत संकटामुळे विक्रमी 306 अब्ज डॉलर्सचं विक्रमी नुकसान झालं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)