बगदादमध्ये आत्मघाती हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची भिती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मृतांची संख्या वाढण्याची भिती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इराकची राजधानी बगदादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन दिवसांत बगदादमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.

शहरातल्या तायरान चौकात झालेल्या हल्ल्यात किमान 90 झण जखमी झाले आहेत. या चौकात नेहमी गर्दी असते कारण इथं अनेक मजदूर कामाच्या शोधात दररोज जमतात. कट्टरवाद्यांनी याआधीही या ठिकाणाला लक्ष्य केलं आहे.

बगदादच्या मोठ्या भागावर 2014 पासून इस्लामिक स्टेटचा ताबा आहे. तेव्हापासून इथं जवळपास दररोज विस्फोट होत आहेत. असं असलं तरी डिसेंबरनंतर कट्टरवाद्यांच्या पराभावनानंतर हल्ल्यांची संख्या कमी झाली.

सोमवारच्या हल्ल्यात दोन हल्लेखोर सहभागी होते, ज्यांच्या अंगावर आत्मघाती स्फोटकं होती, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

एका पाठोपाठ मृतदेह काढले जात असल्यानं मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. AFPच्या वृत्तानुसार घटनास्थळावर मोठ्या संख्येने संरक्षण दल उपस्थित आहे.

याआधी शनिवारी शहराच्या उत्तरभागात एका तपासणी नाक्यावरही आत्मघाती हल्ला करण्यात आला होता, ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.

मे महिन्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)